Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जाणून घ्या सूर्य नमस्काराचे 12 चरण आणि त्याचे फायदे

जाणून घ्या सूर्य नमस्काराचे 12 चरण आणि त्याचे फायदे
, मंगळवार, 21 जून 2016 (12:16 IST)
योगासनात सूर्यनमस्काराला सर्वश्रेष्ठ आसन मानले जाते. सूर्यनमस्कारामध्ये जवळपास सर्वच आसनांचा समावेश आहे. यापासून व्यक्तीला अधिक लाभ होतो. सूर्यनमस्कार नियमित केल्याने व्यक्तीचे शरीर निरोगी राहून तेजस्वी होते. सूर्यनमस्कार बाराही महिने करू शकता. उजव्या पायाने व डाव्या पायाने अशा सूर्यनमस्कार करण्याच्या दोन पद्धती आहेत. 





















(1) सुरवातीला सावधान मुद्रेत सरळ उभे राहावे. त्यानंतर दोन्ही हात खांद्याच्या समांतर रेषेत ठेवून डोक्याच्या दिशेने सरळ करावे. दोन्ही हाताचे पंजे जोडावे व त्याच अवस्थेत त्यांना खाली आणावे. म्हणजे आपण देवाला नमस्कार करतो त्या अवस्थेत उभे राहावे.
 
(2) जोरात श्वास घेऊन दोन्ही हात कानाला चिकटून राहतील अशा स्थितीत आणून मान व दोन्ही हात मागील बाजूने वाकवावे. असे करत असताना हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, कानही ताठ राहिले पाहिजेत.

(3) तिसर्‍या अवस्थेत श्वास हळू हळू सोडून पुढच्या बाजूने वाकावे. कानाला चिकटलेल्या अवस्थेत हात जमिनीला ठेकवावे. गुडघे सरळ ठेवावेत. काही क्षण अशा अवस्थेत थांबावे. या अवस्थेला 'पाद पश्चिमोत्तनासन' म्हटले जाते.
 
(4) त्यानंतर श्वास हळू हळू घेऊन डाव्या पायाच्या मागच्या बाजूला न्यावे. छातीला पुढच्या बाजूला जेवढे ताणता येईल तेवढे ताणावे. मान मागच्या बाजूला न्यावी. पाय ताणलेल्या अवस्थेत व शरीराच्या पुढच्या बाजूला ताणलेले अशा स्थितीत काही क्षण राहावे.
 
(5) श्वास हळू हळू सोडून उजवा पाय देखील डाव्या पायाप्रमाणे मागच्या बाजूला न्यावा. यावेळी दोन्ही पायाचे पंजे एकमेकाशी जोडलेले पाहिजेत. शरीर पायाच्या बाजूने ओढावे व पायाच्या टाचा जमिनीला टेकण्याचा प्रयत्न करावा. कमरेला जास्तीत जास्त वर उचलण्याचा प्रयत्न करावा.
 
(6) श्वास घेत शरीराला जमिनीच्या समांतर ठेवून साष्टांग दंडवत घालावे व सुरवातीला गुडघे, छाती व डोके जमिनीला टेकवावे. यावेळी कंबर वरच्या बाजूला उचललेली पाहिजे. श्वास सामान्य गतीने सुरू ठेवावा.

(7) दोन्ही हातांवर जोर देऊन छातीला पुढच्या बाजूने ओढावे. मान सरळ ठेवून मागच्या बाजूने न्यावी. गुडघ्याचा जमिनीला स्पर्श करून पायाचे पंजे उभे ठेवावे. या अवस्थेला 'भुजंगासन' म्हटले जाते. 
 
(8) ही अवस्था - पाचव्या अवस्थेसारखी आहे. 
 
(9) ही अवस्था - चौथ्या अवस्थेसारखी आहे.
 
(10) ही अवस्था - तिसर्‍या अवस्थेसारखी आहे.
 
(11) ही अवस्था - दुसर्‍या अवस्थेसारखी आहे. 
 
(12) ही अवस्था - पहिल्या अवस्थेसारखी राहील. 

वरील बारा पायर्‍या केल्यानंतर थोडा विश्राम करण्यासाठी ताठ सरळ उभे राहावे. त्यानंतर पुन्हा हे आसन करावे. पहिली, दुसरी व तिसऱ्या अवस्थांचा क्रम आधी केल्याप्रमाणेच राहील. मात्र, चौथी अवस्थेत जेथे डावा पाय मागे केला होता तेथे आता उजवा पाय मागे करत सूर्यनमस्कार करावा.
 
इशारा : ज्या व्यक्तींना कंबर व पाठीच्या मणक्याचे आजार आहे त्यांनी हे आसन करून नये. त्यांनी सूर्यनमस्कार करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. 
 
फायदा : सूर्यनमस्कार सर्वांसाठीच लाभदायी आहे. सूर्यनमस्कार नियमित केल्याने हातपायाचे दुखणे दूर होऊन त्यांच्यात बळकटपणा येतो. मान, छाती व हाताची दंड भरतात. शरीरावरील बिनकामाची चरबी कमी होते. 
 
सूर्यनमस्कार केल्याने त्वचेचे आजारही कायमचे दूर होतात. नियमित केल्याने पोटाच्या समस्या नाहीशा होऊन पचन क्रिया वाढते. अतिनिद्रा, अल्सर आदी आजारही नाहीसे होतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

योगातून प्राप्त करा संमोहन शक्ती