Publish Date: Sat, 05 Jun 2021 (19:00 IST)
Updated Date: Sat, 05 Jun 2021 (19:02 IST)
आजकाल कंबरदुखी चा त्रास खूप सामान्य झाला आहे.कंबरदुखीच्या त्रासामुळे लोक त्रस्त आहेत.कंबरेत वेदना असल्यास काम करायला देखील खूप त्रास होतो.दिवसभर बसून काम केल्याने हा त्रास उद्भवतो. परंतु हा त्रास काही व्यायाम आणि योगा करून दूर केला जाऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊ या कोणत्या योगासनाने ही वेदना कमी केळी जाऊ शकते.
1 ब्रिज पोझ- हे करण्यासाठी तळपाय चटई वर एकमेकांना लावून ठेवा आणि दोन्ही गुडघे उचलून शरीराला पुलाचा आकार द्या.दोन्ही हात बाजूला ठेवा.हळू-हळू श्वास घेत आपल्या क्षमतेनुसार कुल्हे उचलण्याचा प्रयत्न करा आणि कुल्हे जमिनीला स्पर्श करा. या क्रियेची पुनरावृत्ती किमान 20 ते 30 वेळा करा.
2 स्पायनल ट्विस्ट -हे व्यायाम करून आपण कंबरदुखीच्या त्रासाला पळवून लावू शकता.हे करण्यासाठी सर्वप्रथम पाठीवर झोपा. दोन्ही गुडघे दुमडून वर उचला.आता दोन्ही पाय डावी कडे आणि उजवी कडे दुमडा. आता दोन्ही पाय आधी वर घेऊन जा नंतर खाली आणा. ही प्रक्रिया किमान 25 ते 30 वेळा करा.
3 कोब्रा पोझ-कोब्रा पोझ केल्याने कंबरेच्या वेदनेपासून आराम मिळतो.हे करायला देखील सोपे आहेत.हे करण्यासाठी पोटावर झोपा.दोन्ही हातांना छातीजवळ आणा,दीर्घ श्वास घेत छातीवर उचला.शक्य तितके डोके मागे न्या.हळू-हळू श्वास सोडत छाती खाली आणा.हे योगा 15 ते 20 वेळा करा.हे केल्याने कंबरदुखीमध्ये आराम मिळेल.