Do this asana before starting yoga आपण जर प्रथमच योगा करत आहात तर काळजी करू नका.हे काही सोपे आसन करून आपण योगासनाला सुरु करू शकता.जेणे करून आपल्याला आरोग्याचे फायदे मिळतील.हे आसन करायला खूप सोपे आहेत,जे कोणीही सहजपणे करू शकतो.चला तर मग जाणून घेऊ या.कोणते आहेत ते आसन.
1 बालासन -जर आपण योगासन करणे सुरूच केले आहेत तर हे आसन करा.हे केल्याने आपले मेंदू आणि मन शांत राहील.आणि हे करायला खूप[ सोपं आहे.हे करण्यासाठी सर्वप्रथम वज्रासनात बसा.नंतर आपले डोकं जमिनीला स्पर्श करा. दोन्ही हाताला जमिनीवर ठेवा.छातीने मांडीवर दाब द्या.
2 नौकासन-हे आसन करायला काही अवघड नाही.हे केल्याने शरीराला व्यवस्थित आकारात आणू शकतो.अनेक रोगापासून मुक्ती देखील मिळते.हे करण्यासाठी सर्वप्रथम पाठीवर झोपा.दोन्ही पाय जोडून घ्या.दोन्ही हात पायाजवळ ठेव.हाताला पायाकडे ओढा आणि पाय आणि छाती वर उचला.आपले डोळे,हाताचे बोट,आणि पायाचे बोट सरळ असावे.पोटाच्या स्नायू आकुंचन झाल्यामुळे नाभीत होणाऱ्या ताण अनुभवा.
3 सर्वांगासन -हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे,हे शरीरातील सर्व अवयवांसाठी फायदेशीर आहे.कारण या मुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होत.याचा हळू-हळू सराव केल्याने हे आसन करण्यास सहज होतो.सुरुवातीस हे आपल्या क्षमतेनुसार करावे.हे आसन केल्याने थॉयराइड ग्रन्थि नियंत्रित होते आणि शरीरातील पचन पासून पाठीच्या कणा पर्यंतच्या क्रिया सुरळीत होतात.