पाठीचा कणा कमकुवत होणं हे चांगले लक्षण नाही.या मुळे नवीन समस्या उद्भवू शकतात.या समस्येमधून आपण योगाद्वारे मुक्ती मिळवू शकता.काही योगासन करून आपण पाठीचा कणा बळकट करू शकता.नियमितपणे काही सोपे आसनाचा सराव केल्याने फायदा मिळू शकतो.चला तर मग जाणून घेऊ या.
मार्जरी आसन- सर्वप्रथम गुडघे आणि हातावर उभे राहा आणि पाठीला वर उचलून धरा.श्वास आत घेत डोकं छताकडे न्यावे आणि शरीराची कंबरेकडील बाजू वाकवा. श्वास सोडताना हनुवटी छातीला लावून ठेवा आणि पाठीला वर उचला.या आसनाचा सराव चार ते पाच वेळा करा.
पादहस्तासन-हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम आपण पायांवर सरळ उभे राहा आणि हाताला शरीराच्या जवळ ठेवा.श्वास आत घेऊन हाताला डोक्याच्या वर घेऊन जा आणि वर ओढा.श्वास सोडताना पाठीचा कणा सरळ ठेवा हात आणि गुडघे सरळ ठेवून पुढे वाका आपले हात जमिनीवर ठेवा आणि टाचांना धरून ठेवा.