Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वजन कमी करण्यासाठी दररोज हे योगासन करा

वजन कमी करण्यासाठी दररोज हे योगासन करा
, शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (22:51 IST)
आजच्या काळात चुकीच्या खाण्यापिण्यामुळे आणि बदलत्या जीवनशैली मुळे वजन वाढणं ही सामान्य बाब आहे. परंतु सतत वजन वाढणे ही चिंतेची गोष्ट आहे.हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. या मुळे अनेक आजार होऊ शकतात. वजन कमी करण्यासाठी आपण दररोज योगाभ्यास देखील करू शकता. योग केल्याने आपण बरेच आजारांपासून सुरक्षित राहू शकता. आज आम्ही आपल्याला अशा काही योगासनाबद्दल सांगत आहोत जे वजन कमी करण्यात कामी येतात.
 
1 सूर्य नमस्कार -
वजन कमी करण्यासाठी दररोज सूर्य नमस्कार करावा. दररोज सूर्य नमस्कार केल्यानं आपण बऱ्याच आजारांपासून सुरक्षित असू शकता.सूर्य नमस्कार करणं खूप सोपं आहे. 
 
2 वीर भद्रासन-
दररोज वीर भद्रासनाचा सराव केल्यानं वजन नियंत्रणात राहते. आपण देखील वाढत्या वजनाने त्रासलेले आहात तर दररोज वीर भद्रासन करावं. ह्याचा नियमितपणे सराव  केल्यानं काहीच आठवड्यात फरक दिसेल. 
 
3 भुजंगासन -
हे करायला खूप सोपं आहे. वजन कमी करण्यासाठी दररोज भुजंगासनाचा सराव करावा. भुजंगासन छाती आणि पाठीसाठी खूप फायदेशीर आहे. 
 
4 धनुरासन -
धनुरासनाचा दररोज सराव केल्यानं काहीच आठवड्यात वजन कमी होत. नियमितपणे ह्याचा सराव केल्याने आपण बरेच आजारापासून सुरक्षित राहू शकता. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चष्मा लावल्याने काळे डाग झाले असल्यास हे करा