Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कंबरदुखी दूर करतील हे 3 योग स्टेप्स

कंबरदुखी दूर करतील हे 3 योग स्टेप्स
, मंगळवार, 27 जुलै 2021 (11:58 IST)
एका वयानंतर कंबरदुखी हा कायमचा आजार बनतो. बर्‍याच गोष्टी घडतात की काम करत असताना आपण त्याच स्थितीत बसून राहतो, ज्यामुळे ही समस्या उद्भवते. ही शक्यता तेव्हा देखील उद्भवते जेव्हा आपलं पोटाचा आकार मोठा झाला असेल. पाठदुखीचा त्रास कोणत्याही वेळी गंभीर स्वरुपाचा असू शकतो. म्हणूनच पाठीचा त्रास टाळण्यासाठी या 3 स्टेप्स अमलात आणाव्या.
 
स्टेप 1- दोन्ही पाय किंचित उघडा आणि समोर पसरवा. दोन्ही हात खांद्यासमक्ष असू द्या. मग डाव्या पायाचे बोट उजव्या हाताने धरून ठेवा आणि डावा हात मागील बाजूला सरळ ठेवा, मान देखील डावीकडे फिरवत मागे वळून पहाण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे दुसर्‍या बाजूनेही करा.
 
स्टेप 2- दोन्ही हाताने विपरित हाताचे मनगट धरुन डोक्यामागे घेऊन जा. श्वास घेत उजव्या हाताने डाव्या हाताला उजव्या बाजूने  डोक्यामागे खेचा. मान आणि डोके स्थिर ठेवा. मग श्वास सोडत हात वर न्या. त्याचप्रमाणे ही क्रिया दुसर्‍या बाजूने देखील करा.
 
स्टेप 3- गुडघे आणि हाताच्या तळव्या वर बसून जा जसे की बैल किंवा मांजर उभा असतो. आता पाठ वरील बाजूला खेचून मान झुकवत पोटाकडे पाहण्याचा प्रयत्न करा. मग पोट आणि पाठ मागील बाजूला खेचा आणि मान वर करा आणि आकाशाकडे पहा. ही प्रक्रिया 8-12 वेळा करा.
 
फायदे: या व्यायामामुळे कंबर दुखीपासून आराम मिळतो आणि पोट निरोगी राहतं. कंबरेची वाढलेली चरबी दूर होण्यास मदत होते. परंतु ज्यांना पाठदुखीचा अधिक त्रास असेल किंवा पोटात गंभीर तक्रारी आहेत, त्यांनी हा व्यायाम करू नये.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गर्भवती महिलांमध्ये कोरोनाव्हायरस लसीची भीती!