Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

योगसाधनेने कमवा बलदंड बाहू

योगसाधनेने कमवा बलदंड बाहू
webdunia

Art of living

बंगलोरचा एक ब्लॉगर म्हणतो, “शाळेत असताना, आर्नोल्ड श्वेझनॅगर यांची ‘पंपिंग आयर्न’ ही डॉक्युमेंटरी फिल्म बघितलेली आठवते. त्यांचे पिळदार दंड बघून मला वाटायचे की एखाद्या माणसाला असे पिळदार दंड आणि खांदे कमावणे खरेच शक्य आहे कां ? त्यानंतरची अनेक वर्षे शरिर कमावण्यासाठी तासंतास जिममध्ये घालवले. जसजसे वर्गातून कामाच्या ठिकाणी स्थलांतर झाले तसतसे कमावलेल्या शरिराचा अर्थही बदलू लागला. आणि पोटाचा घेर मर्यादित ठेवणे हेच लक्ष्य बनले. माझे खांदे कधीच खूप बळकट नव्हते आणि पुशअप्स, पूलअप्स करायला नेहमीच त्रास व्हायचा. एखादी जड वस्तू उचलायची असली आणि काही काळ धरून ठेवायची असली आणि ते मला जमले नाही की मग मला लाज वाटायची. आता, आजकाल कामाच्या अति व्यापामुळे जिममध्ये जावेसेही वाटत नाही.”  
 
आपल्यापैकी अनेकांना असेच बलदंड बाहू आणि सपाट पोट आणि कमावलेले शरिर असण्याची इच्छा असते. पण आपळ्या व्यस्त वेळापत्रकातून एक तास जिमसाठी काढणे आपल्याला शक्य होत नाही. मग आपले ध्येय कसे साध्य करायचे ? बघा, जर स्वत:साठी २० मिनिटे वेळ काढायची तुमची तयारी असली तर योगामुळे फायदा होऊ शकतो. बलदंड बाहू कमावण्यासाठी करण्यासाठी करण्याची आसने खालीलप्रमाणे आहेत. 
 
१. त्रिकोणासन : या आसनामुळे पाय,छाती, मांड्या आणि पाठीचा कणा ताणला जातो आणि त्यांना बळकटी येते. 
२. पूर्वोत्तानासन : वरच्या दिशेने ताण देण्याच्या या आसनामुले मांगते, दंड आणि खांदे यांना बळकटी येते. 
३. विपरीत शलभासन : हात आणि पाय आणि संपूर्ण शरिर ताणले जाणाऱ्या या आसनामुळे छाती,दंड आणि पाठीच्या खालच्या भागातील स्नायूंना बळकटी येते. पोट आणि पाठीच्या खालच्या भागाला व्यायाम होतो. 
४. भुजंगासन : भुजंगासनाने खांदे आणि मान ताणले जातात आणि हात आणि खांदे यांना बळकटी येते. 
५. अधोमुख श्वानासन : या आसनाने शरीराला ऊर्जा मिळते आणि खांदे आणि हात यांना बळकटी येते. 
६. शलभासन : याने पाठ लवचिक बनते आणि खांदे आणि दंड यांना बळकटी येते.  
 
योगासनांच्या नियमित सरावाने शरिर उत्तम प्रकारे कमावता येते आणि बळकट करता येते. योग ही एक कला आहे आणि त्यासाठी वेळ आणि सातत्य याची गरज असते. इतर कोणत्याही प्रशिक्षणाप्रमाणेच योगासने ही तज्ञ प्रशिक्षकाकडून शिकून मग सराव करणे चांगले. सविस्तर माहितीसाठी बघा  www.artofliving.org/yoga

Share this Story:

Follow Webdunia marathi