Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शारीरिक आणि मानसिक फायदे देतात हे तीन योगासन

शारीरिक आणि मानसिक फायदे देतात हे तीन योगासन
, सोमवार, 31 मे 2021 (20:19 IST)
योगाचा परिणाम जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात जाणवला आहे. योगा केवळ व्यायाम नव्हे तर अत्यंत सूक्ष्म विज्ञानावर आधारित ज्ञान आहे, जे शरीर, मन आणि बुद्धी यांच्यात सुसंवाद स्थापित करतो. योगा हे जीवन जगण्याची कला आणि विज्ञान आहे.योगातील काही आसने अशी आहेत जे शारीरिक आणि मानसिक फायदे तर देतातच या व्यतिरिक्त हे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करतात,बद्धकोष्ठता दूर करतात,आणि पचन क्षमता वाढवतात.तसेच हे केल्याने ऊर्जा आणि तजेलपणा जाणवतो चला तर मग जाणून घ्या कोणती आहे ती आसने. 
 
1 भुजंगासन -सामान्यपणे भुजंगाचा अर्थ आहे साप किंवा नाग. हे आसन केल्याने शरीराची स्थिती सापासारखी होते.म्हणून या आसनाला भुजंगासन म्हणतात. हे कसं करावे जाणून घ्या.
 
भुजंगासन करण्याची कृती - सर्वप्रथम पोटावर झोपा,हातांना बाजूला ठेवा. संपूर्ण शरीराला सैल सोडा.पाय आपसात एकत्र जोडा.हळू-हळू दीर्घ श्वास घेत हनुवटी आणि नाभी पर्यंतचे शरीर वर उचला.काही वेळ याच अवस्थेत राहा.श्वास सामान्य ठेवा,हळू-हळू परत येताना श्वास सोडत शरीराला सैल सोडा. कपाळ दोन्ही हातांवर ठेवा आणि पायाला पसरवून विश्रांती घ्या.  
 
2 शलभासन -शलभ चा अर्थ आहे टोळ,हा एक प्रकारचा कीटक आहे.हे आसन केल्यावर आपल्या शरीराची स्थिती टोळ प्रमाणे होते.म्हणून या आसनाला शलभासन म्हणतात.
 
शलभासन करण्याची कृती-हे आसन करण्यासाठी हनुवटी जमिनीला स्पर्श करा दोन्ही हात बाजूने ठेवा,तळहात आकाशाकडे असावे.श्वास आत घेत गुडघे न दुमडता,पाय जेवढे शक्य असल्यास वर उचला.या अवस्थेत 10 -15 सेकंद राहा.सामान्य श्वास सुरु ठेवा.श्वास सोडत पायांना जमिनीवर आणा.
 
3 सेतुबंधासन -सेतूचा सार्थ आहे पूल बांधणे.हे आसन केल्याने शरीराची आकृती एका पुलासम होते, म्हणून याला सेतुबंधासन म्हणतात.
 
सेतुबंधासन करण्याची कृती- सर्वप्रथम पाठीवर झोपा,दोन्ही पाय गुडघ्यापासून दुमडून टाचा कुल्ह्या पर्यंत आणा.हाताने पायाचे तळवे घट्ट धरा. गुडघे आणि पाय सरळ ठेवा.श्वास आत घेत हळू-हळू आपले कुल्हे आणि शरीराला वर उचला.याच अवस्थेत 10ते15 सेकंद राहा.श्वास सुरूच ठेवा.श्वास बाहेर सोडत पूर्वीच्या अवस्थेत परत या.काही वेळ  शवासनात झोपून शरीराला सैल सोडा.
 
टीप- पेप्टिक अल्सर किंवा अलीकडील शल्य क्रिया झालेल्यांनी हे आसन करू नये. तसेच हर्निया असलेले आणि गरोदर स्त्रियांनी हे आसन करू नये.      
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चांगली नोकरी आणि चांगला पगार मिळविण्यासाठी करिअर टिप्स