Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आजचा योग: फ्रोझन शोल्डरच्या समस्येवर ही तीन योगासने प्रभावी आहेत

आजचा योग: फ्रोझन शोल्डरच्या समस्येवर ही तीन योगासने प्रभावी आहेत
, मंगळवार, 29 मार्च 2022 (13:53 IST)
सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीतील वाईटसवयीं मुळे अनेक प्रकारच्या शारीरिक-मानसिक आरोग्याच्या  समस्यांचा धोका वाढला आहे. लहान वयात, लोकांना सांधेदुखी, हाडे दुखी आणि इतर सर्व प्रकारच्या आरोग्य-संबंधित समस्या होण्याचा धोका वाढतो.लोकांमध्ये फ्रोझन शोल्डरची समस्याही वाढत आहे. दिवसभर कॉम्प्युटरसमोर बसण्याची सवय, घरी मोबाईल-टीव्हीसारख्या गॅझेटला चिकटून राहिल्याने फ्रोझन शोल्डरचा त्रास आणखी वाढला आहे.
 
फ्रोझन शोल्डर ही एक अशी समस्या आहे ज्यामध्ये आपले खांदे संकुचित होतात आणि शेवटी जाम होतात. ही एक वेदनादायक स्थिती आहे ज्यामध्ये हात उचलणे देखील कठीण होते. कालांतराने, त्याची लक्षणे तीव्र होतात. ही समस्या टाळण्यासाठी योगासनांचा नियमित सराव केल्याने या त्रासाला दूर करण्यास उपयुक्त ठरू शकते. काही योगासनांचा सराव करून फ्रोझन शोल्डरच्या समस्येत फायदा मिळू शकतो. चला तर मग त्या योगासनांच्या विषयी जाणून घेऊ या.
 
1 सूर्य नमस्कार- सूर्य नमस्काराचा सराव केल्याने खांदेदुखीच्या समस्येवर फायदेशीर ठरते. मान आणि खांदे दुखण्याचा त्रास असल्यास सूर्यनमस्काराचा सराव काळजीपूर्वक करा.  हे नियमितपणे आणि पद्धतशीरपणे केले तर ते खांद्यांना मजबूत करते आणि मणक्याची लवचिकता वाढवते. मानदुखी, खांदेदुखी आणि सर्वाइकल स्पॉन्डिलोसिसच्या समस्येमध्येही हे करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. 
 
2 मत्स्यासन योग -हे योग संपूर्ण शरीराची ताकद आणि लवचिकता वाढवण्यास मदत करू शकतो. हे खांद्याच्या दुखण्यावर अत्यंत फायदेशीर योगासनांपैकी एक आहे. मत्स्यासन योगाचा नियमित सराव केल्याने संगणकासमोर बराच वेळ बसल्यामुळे होणारा ताण आणि स्नायूंच्या तणावा पासून मुक्त होण्यासाठी आणि संपूर्ण शरीरात रक्ताभिसरणाला चालना देण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. त्याच्या दैनंदिन सरावामुळे फ्रोझन शोल्डरचा धोका ही कमी होतो.
 
3 भुजंगासन- या योगाचा सराव आपल्या शरीराच्या सर्व मज्जातंतूंसाठी, आपल्या मणक्यापासून, मेंदूसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. भुजंगासनामुळे मान आणि खांद्याचा कडकपणा दूर होतो आणि मणक्याचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. भुजंगासन योगाचा नियमित सराव करणं ज्यांना पाठदुखीचा त्रास होतो. अशा लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतं  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उन्हाळ्यात सनबर्न होणार नाही जर या प्रकारे घेतली काळजी