Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आरोग्यासाठी फायदेशीर वीरासन

आरोग्यासाठी फायदेशीर वीरासन
, शनिवार, 2 जानेवारी 2021 (09:44 IST)
आजच्या काळात खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आणि बदलत्या जीवनशैली मुळे बऱ्याच आजारांचा धोका आहे. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी दर रोज वीरासन करावे. वीरासनाचा सराव केल्याने बऱ्याच आजारांपासून वाचता येऊ शकत. चला तर मग वीरासनाचे फायदे जाणून घ्या.
 
* दम्याच्या रुग्णांसाठी फायदेशीर - 
हे आसन दम्याच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. या आसनाचा सराव केल्याने दम्याच्या त्रासापासून सुटका होऊ शकते.

* उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर - 
वीरासनाचा सराव केल्याने उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. हे आसन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी दररोज वीरासन करावे.
 
* पचन तंत्र बळकट होतो - 
निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी पचन तंत्र बळकट होणं खूप महत्त्वाचे आहे. पचन तंत्र बळकट करण्यासाठी दररोज वीरासनाचा सराव करावा.असं केल्यानं पचनाशी निगडित समस्यांपासून मुक्तता होते.
 
* मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर - 
हे आसन मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आजच्या काळात बरेच लोक मानसिक तणावाने वेढलेले असतात हे तणाव दूर करण्यासाठी दररोज वीरासनाचा सराव करावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संयुक्त राज्य कृषी सेवा परीक्षा : 564 पदांच्या भरतीसाठी अर्ज सुरू