Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 31 March 2025
webdunia

कामाच्या व्यस्ततेमधून वेळ काढून महिलांनी हे योगासन करावे

Women should do this yoga pose do this yogaa to keep healthy and fit mahilansathi yogaasan yogasan for ladies yaogasan baalasana malaasana vrukshasan yogaa  in marathi webdunia marathi
, बुधवार, 3 मार्च 2021 (20:00 IST)
बहुतेक स्त्रिया दिवसाच्या कामातून स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही. त्यामुळे त्यांना लठ्ठपणा, रक्तदाब,मधुमेह, थॉयराइड आणि गुडघेदुखी सारख्या समस्यांना सामोरी जावे लागते. या वरील उपाय  म्हणजे योगा. आपण स्वतःला निरोगी ठेवू इच्छित असल्यास कामाच्या व्यस्ततेमधून स्वतः साठी वेळ काढा आणि हे योगासन आवर्जून करा.
 
1 बालासन-
ज्या महिलांना योग सुरू करायचे आहे त्यांनी बालासन करायलाच हवे. हा योगासन शरीराला लवचीक बनविण्यात मदत करतो. हे सहज पणे करता येत.बालासन केल्याने मानसिक शांती मिळते आणि तणाव कमी होतो. 
 
2 मलासन-
पाय आणि मांड्यांचे  हाडे मजबूत करावयाचे असल्यास काही काळ हे आसन करा. हे आसन करण्यासाठी सर्वप्रथम चटई वर सरळ उभे राहा. मग गुडघे टेकवून नमस्काराच्या मुद्रेत बसा.लक्षात ठेवा गुडघ्यामध्ये अंतर राखायचे आहे  .हे आसन केल्याने पाय किंवा मांडीच्या दुखण्यापासून आराम मिळतो.
 
3 वृक्षासन-
हे आसन उभे राहून केले जाते जे संतुलन ठेवण्यात मदत करते.    
मेंदूला शांत ठेवून शरीराचे संतुलन ठेवणारे हे आसन महिलांसाठी खूप फायदेशीर आहे. हे करण्यासाठी चटई अंथरून सरळ उभे राहा. नंतर एक पाय उचलून दुसऱ्या पायाच्या गुडघ्याला लावून उभे राहा. नंतर एका पायावर उभे राहून संतुलन करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बोध कथा : मूर्ख शेळ्या भांडून मेल्या