Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 20 March 2025
webdunia

कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी इम्युनिटी वाढवणारे 4 योगासन

कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी इम्युनिटी वाढवणारे 4 योगासन
, मंगळवार, 16 जून 2020 (15:35 IST)
कोविड 19 या कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी सामाजिक अंतर, मास्क आणि हॅन्ड वॉश खूप गरजेचे आहे. या व्यतिरिक्त आपल्या सुरक्षेसाठी आयुर्वेदिक काढा पिणे, गरम पाणी पिण्याशिवाय दर रोज योगासन करायला हवं. जेणे करून आपली रोग प्रतिरोधक क्षमता बळकट होईल. चला तर मग जाणून घेऊया की योगामुळे आपल्याला कशी मदत होऊ शकते.
 
1 सूर्य नमस्कार : सूर्य नमस्कार यात सर्व आसनं समाविष्ट आहेत आणि हे सर्व आजारांवर प्रभावी आहे. आपण घरामध्येच चांगल्या प्रकारे योग करतं राहाल तरच आपण निरोगी राहू शकाल आणि आपले वजन पण वाढणार नाही. योगामध्ये आपण सूर्यनमस्काराच्या 12 चरणांना किमान 12 वेळा तरी करावं आणि दुसरे असे की कमीत कमी 5 मिनिटे अनुलोम विलोम प्राणायाम केले पाहिजे. ही संपूर्ण प्रक्रिया करण्यासाठी फक्त 15 ते 20 मिनिटे लागतात. आपणास ठाऊक नसेल की हे आपल्यासाठी किती फायदेशीर ठरेल. जर आपल्याला हे करणे शक्य नसेल तर खालील दिलेले आसन करावे.
 
1 शौच : नकारात्मक भावना, भीती, आणि काळजीमुळे रोग प्रतिरोधक शक्ती कमी होते. 
शौच क्रियेने नकारात्मकतेची भावना नाहीशी होते. मुळात शौचाचे अर्थ आहे स्वच्छ आणि पावित्र्य होणे. शौच म्हणजे शुचिता, शुद्धता, पवित्रता आणि स्वच्छता. पावित्र्याचे दोन प्रकार असतात. बाह्य आणि आंतरिक. 
 
बाह्य किंवा शारीरिक शुद्धतेचे देखील दोन प्रकार असतात. पाहिल्यामध्ये शरीराला बाहेरून शुद्ध करतात. या मध्ये माती, उटणे, त्रिफळा, कडुलिंब इत्यादी लावून स्वच्छ पाण्याने अंघोळ केल्याने त्वचा आणि अंगांची शुद्धी होते आणि दुसऱ्यामध्ये शरीराच्या अंतर्गत अवयवाच्या शुद्धीकरणासाठीचे योगामध्ये बरेच उपाय सांगितले आहे. जसे शंख प्रक्षालन, नैती, नौली, धौती, गजकर्णी, गणेश क्रिया, अंग संचालन इत्यादी. आंतरिक किंवा मानसिक शुद्धीसाठी मनाच्या भावना आणि विचार समजणे. जसे काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार याचा त्याग केल्याने मनाची शुद्धी होते आणि चांगल्या वर्तणुकीचा जन्म होतो.
 
2 ध्यान : ध्यान केल्याने आपली गमावलेली ऊर्जा पुन्हा मिळते आणि सोबतच अतिरिक्त ऊर्जेचाही जमाव होऊ लागतो. जे आपल्याला सर्व प्रकाराच्या आजाराशी आणि दुःखाशी लढण्याला मदत करतं. ध्यान अनावश्यक विचार आणि कल्पनांना मनातून काढून शांत राहावयाचे आहे. विचारांवर नियंत्रण करणे म्हणजेच ध्यान. 
 
निरोगी राहण्यासाठी ध्यान. ध्यानामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित होतं. डोकेदुखी दूर होते. शरीराची प्रतिकारक शक्ती वाढते. ध्यानामुळे शरीरामध्ये स्थिरता वाढते. ही स्थिरता शरीरास बळकट करते. डोळे मिटून श्वासाच्या गती आणि मानसिक हालचालींवर लक्ष द्या की जसे एक विचार मनात आला आणि तो गेला, लगेच दुसरा विचार मनात आला आणि तो गेला. आपल्या लक्षात येईल की आपण उगाचच विचार करत आहात. याचा सरावामुळे मनाला शांती आणि ऊर्जा मिळेल.
 
3 भस्त्रिका प्राणायाम : भस्त्रिकाचा शाब्दिक अर्थ आहे फुंकणे किंवा भाता. एक असा प्राणायाम ज्यामध्ये लोहाराच्या फुंकणी सारखी आवाज करीत वेगाने शुद्ध प्राणवायू आत घेतली जाते आणि अशुद्ध वायू बाहेर फेकण्यात येते. अनुलोम विलोम मध्ये पारंगत झाल्यावर हे करावे. 
विधी : सिद्धासन किंवा सुखासनामध्ये बसून कंबर, मान आणि मणक्याला ताठ ठेवून मनाला स्थिर ठेवा. डोळे मिटून घ्या. नंतर उच्च वेगाने श्वास घ्या, आणि तसेच वेगाने बाहेर सोडा. श्वास घेताना पोट फुगले पाहिजे आणि श्वास सोडताना पोट आतल्या बाजूला गेले पाहिजे. असे केल्याने बेंबीवर दाब पडतो. हे प्राणायाम करताना श्वासाची गती कमी करा, म्हणजे दोन सेकंदामध्ये श्वास भरा आणि श्वास सोडा. नंतर श्वासाचा वेग वाढवा. म्हणजे एका सेकंदामध्ये दोन वेळा श्वास भरणे आणि सोडणे. श्वास घेताना आणि सोडताना एकसारखा वेग ठेवा. आणि पुन्हा सामान्य स्थितीमध्ये येण्यासाठी श्वासाचा वेग कमी करीत राहा आणि शेवटी एक दीर्घ श्वास घेऊन श्वास सोडताना पूर्ण शरीर सैल सोडा. या नंतर योगाचार्य किमान पाचवेळा कपालभाती प्राणायाम करण्याचा सल्ला देतात.
 
4 क्रिया : योगाच्या क्रिया फार कठीण असतात. हे केवळ एखाद्या योग्य प्रशिक्षकांकडूनच शिकून करता येतात. यामध्ये विशेष करून धौती क्रिया, नैती क्रिया आणि बाधी क्रिया विशेष आहे.
धौती : एका चार बोट अरुंद आणि सोळा हाताची लांब बारीक कापड्याची पट्टी तयार करून त्याला गरम पाण्यामध्ये उकळवून हळुवार खावी. खाऊन जेव्हा पंधरा हाती कापड पोटामध्ये गेल्यावर, फक्त एक हात बाहेर शिल्लक राहिल्यावर, पोटाला ढवळून हळुवार त्याला पोटातून बाहेर काढावे.
त्याचे फायदे : या क्रियेचा दररोज सराव केल्याने कोणत्याही प्रकारचे त्वचेचे आजार होत नाही. पित्त आणि कफाचे आजार नाहीसे होतात आणि संपूर्ण शरीर शुद्ध होतं. गळ्यामधील आणि छातीमधील साठलेली घाण बाहेर पडते. पण या क्रियेला योग्य पद्धतीने शिकूनच करावं नाही तर विपरित परिणाम भोगावे लागू शकतात. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Benefits Of Meditation : फायदे जाणून नक्कीच जीवनात सामील कराल