स्नायूंचे असंतुलन सुधारण्यासाठी, मुद्रा सुधारण्यासाठी आणि शारीरिक एकाग्रतेला प्रोत्साहन देण्यासाठी ताडासन फायदेशीर आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी विविध प्रकारच्या योगासनांचा नियमित सराव प्रभावी आहे. ताडासन योगाचा नियमित सराव केल्याने शरीराची एकाग्रता वाढते ज्यामुळे शरीराचे संतुलन व्यवस्थित राहते.रक्ताभिसरण वाढून शारीरिक मानसिक आरोग्याला फायदा होतो. दररोज ताडासनाचा सराव केल्याने आरोग्यदायी फायदे मिळतात. चला तर मग हे योगासन करण्याची पद्धत आणि मिळणाऱ्या फायद्यांविषयी जाणून घेऊ या.
ताडासन योग करण्याची पद्धत -
हा योग करण्यासाठी सर्वप्रथम कंबर आणि मान सरळ ठेवून सावधानच्या मुद्रेत उभे राहावे. आता हात वरच्या दिशेने ओढताना शरीरालाही वरच्या दिशेने ओढून घ्या. पायाच्या बोटांपासून हाताच्या बोटांपर्यंत एक ताण निर्माण करा. काही काळ या स्थितीत रहा. श्वास सोडताना हळूहळू पूर्वीच्या स्थितीत या. हे 5 -10 मिनिटे करू शकता.
ताडासनाचे आरोग्यदायी फायदे-
योग तज्ञांच्या मते, ताडासन योगाचा नियमित सराव केल्याने शरीराला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो. या आसनाचा सतत सराव केल्याने आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
* शरीराची लवचिकता सुधारण्यासाठी फायदेशीर.
* कंबर , पाठ आणि पाय दुखण्यात आराम मिळतो.
* वजन वर नियंत्रणासाठी प्रभावी .
* तणाव दूर करण्यासाठी उपयुक्त.
* स्नायूंना टोन करण्यास मदत करते.
* श्वासोच्छवासाची पद्धत सुधारण्यास मदत होते.
* पचनसंस्था सुधारण्यास उपयुक्त.
* शरीराचे संतुलन सुधारण्यासाठी फायदेशीर.