Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आरोग्यासाठी योगाभ्यास

आरोग्यासाठी योगाभ्यास
, मंगळवार, 21 जून 2016 (16:50 IST)
आपले शरीर हे एक यंत्रच आहे. त्याची योग्य काळजी घेणे, ते स्वच्छ ठेवणे, त्याची झीज भरून काढणे या गोष्टी नीट रितीने केल्या तरच शरीरयंत्र सुव्यवस्थित राहून आपल्या इच्छेप्रमाणे त्याकडून काम होऊ शकते. नाहीतर इच्छा असूनही शारीरिक कमकुवतपणामुळे स्वस्थ बसावे लागते. सर्व गोष्टींचा उपभोग आपल्याला शरीराच्या माध्यमातूनच घेता येतो. म्हणूनच ‘शरीरमाद्यं खलु धर्म साधनम्’ या उक्तीप्रमाणे सर्व प्रथम आपले शरीर बलवान, सामर्थ्यवान झाल्यासच आपले शरीर हवे तेवढे काम करू शकते. परंतु आपण आपल्या शरीरावर एवढे अत्याचार करत असतो की ते बलवान व्हावाच्या अगोदरच बलहीन होते. अशा बलहीन शरीराला शक्ती प्राप्त करून शरीर परत ताजेतवाने करावास सर्व दृष्टीने ‘योगासना’शिवाय पर्याय नाही.
 
आपल्या शरीरात जीवनशक्ती रस पुरविणार्‍या अनेक गाठी आहेत. गळ्याजवळ (थॉयरॉईड), मूत्रपिंडालगत (अँड्रेनल), मेंदूखाली (पिटय़ूटरी), पॅरॉथॉराईड, प्लीहा, कृत वगैरे ग्रंथी म्हणजे ग्लॅडस् आपल्या शरीराच्या पोषणार्थ नेहमी काम करीत असतात. या ग्रंथीच्या कामातील अडथळ्याने वाढ खुंटणे, पचन बिघडणे, भ्रमिष्टपणा येणे, अंग ठणकणे वगैरे तारुण्य टिकविण्यास याच ग्रंथींचा उपयोग होतो. वाढ, शरीरष्टी व शील या गोष्टी या गाठींच्या अवस्थेवर अवलंबून असतात. शरीराच निरोगीपणास व पुष्टतेस समप्रमाणात ज्याची अधिकाधिक मदत होईल असा व्यायाम म्हणजे ‘योगासना’चा व्यायाम.
 
योगासनामुळे श्वोसोच्छ्वास निमित होतो. त्यात स्थिरता येते. मन एकाग्र होऊ शकते. निरनिराळ्या स्नायूंना ताण पडून त्यातील रुधिराभिसरण नियमबाह्य व सुरळीत होते. विविध पेशींना रक्तपुरवठा चांगला होतो. नाडय़ा यग्यरितीने ताणल्या जाऊन त्यांचे संदेशवहनाचे काम जास्त तीव्रतेने होऊ लागते. शरीराचे पोषण व वर्धन करणार्‍या अनेक गाठींवर ‘योगासनांचा’ सर्वोत्कृष्ट परिणाम होतो. ही गोष्ट दुसर्‍या   कोणतही व्यायामाने साध्य होत नाही. 
 
योगासने आपल्या शरीराबरोबर मनाचीही मशागत करून प्रसंगानुरूप जी परिस्थिती येईल त्याला यशस्वी टक्कर देऊन सदैव शरीर व मन यांचे आरोग्य अबाधित राखतो. 12 वर्षापुढील कोणालाही योगासने करता येतात.
 
‘युवा वृद्धोतिवृद्धोव। व्याधितो दुर्बलोपिवा।
अभ्यासात्सिद्धिमातोति सर्व योगेश्वतंद्रित:।।’
 
प्रत्यक्ष योगाभ्यास शिकणकरता ‘सोप्याकडून अवघडाकडे’ व ‘ज्ञानातून अज्ञानाकडे’ या शिक्षणपद्धतीच मूलतत्त्वाच आधारेच शिकावे लागते. एक तास योगाभ्यास करणे हा आपल्या दिनर्चेचाच भाग व्हायला हवा. रोज जसे आपण जेवतो, झोपतो त्याचा आपल्याला कधी कंटाळा येतो का? त्याचप्रमाणे रोज योगाभ्यास करालाच हवा. त्याचा कंटाळा करू नये. उलट योगाभ्यासाने कंटाळा, आळस नाहीसा होतो असाच सर्वाचा अनुभव आहे. वापरलेली बॅटरी ज्याप्रमाणे चार्ज केल्यानंतर अधिक प्रखर होते. त्याप्रमाणे शरीर व मनाची बॅटरीही योगाभ्यासाने  चार्ज केली म्हणजे ती अधिक कार्यक्षमतेने कार्य करू शकेल. एक तास केलेल्या योगाभ्यासाचे परिणाम उरलेले तेवीस तास जाणवतात.
 
नियमित योगाभ्यासामुळे शरीराचा व मनाचा आळस कमी होतो. व्यसनाधिनता कमी होते. स्वभाव सुधारतो, परस्पर सामंजस्य वाढते. असे कितीतरी फायदे सांगता येतील. आपणाला एक अनुनूभूत असा आनंद जाणवाला लागेल. या सर्वाचा परिणाम आपल्या दिनचर्येवर पडेल. आपली दिवसभरातील शारीरिक, मानसिक र्काक्षमता वाढू लागेल. मनाची स्थिरता व शांतता वाढल्याचे लक्षात येईल. आपल्या वागण्यातही  बदल होईल. कोणत्याही परिस्थितीचा वैताग येणार नाही. आपण एकूणच परिस्थितीला आनंदाने सामोरे जाऊ शकाल. थोडक्यात योगाभ्यासाने सर्व काही मिळते.
 
आधुनिक सुविधांनी जीवन सुकर केले. परंतु जिणे ‘दुष्कर’ केले आहे. घाई, गडबड, गोंधळ, वेग, ताणतणाव यांच्या धावपळीत काळजी, निराशा व उद्वेग यांनी वेढलेल्या माणसाला हृदरोग, मधुमेह, रक्तदाब यांनी त्रस्त केले आहे. या सर्वावर उपाय म्हणजे नियमित योगाभ्यास   करणे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काही उपयोगी किचन टिप्स