Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दैनिक राशीफल 04.03.2022

दैनिक राशीफल 04.03.2022
, गुरूवार, 3 मार्च 2022 (23:55 IST)
मेष : जवळच्या नात्याचा आनंद घेण्यावर आपले चित्त एकाग्र करा. स्वार्थी बनू नका. प्रेम-प्रसंगात यश मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींसाठी कामात स्थिती सुखदायक राहील. व्यापार-व्यवसायात आर्थिक लाभ मिळेल. कला जगातील व्यक्तींना लाभ मिळेल. 
वृषभ : आर्थिक व व्यापारिक मुद्द्यांबद्दल आपले गंभीर विचार श्रेयस्कर ठरतील. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर एकांतात वेळ घालवण्याची आपली इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज आपणास आपल्या सामर्थ्यावर विश्वास होईल. 
मिथुन : एखादे कार्ये घाईत पूर्ण करण्याची आपली इच्छा प्रश्न उभे करू शकते. पर्याप्त लाभ मिळणे कठीण. व्यापारिक करार व व्यवहारात सावधगिरी बाळगा. नोकरीपेशा व्यक्ती वायफळ खर्च टाळा.  आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. 
कर्क : आपण कार्याच्या विषयी गुप्त धोरणे राखून यश मिळवू शकाल. पळापळ अधिक राहील. शेयरच्या विषयामध्ये सावधगिरी बाळगा. महत्वाकांक्षा पूर्ण झाल्यामुळे आनंद वाटेल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस उत्तम व्यतीत होईल.
सिहं : आपणास आपल्या एकाग्रतेच्या शक्तीतून काहीतरी शिकायला मिळेल आणि आपण जे काही शिकला असाल ते सांगू शकाल. जीवनात नव्या सुरुवातीसाठी उत्तम वेळ आहे. वाहनसुख मिळेल. मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील. 
कन्या : धन लाभचे उत्तम योग संभवतात. कार्यात पत्नीचा आधार मिळेल. माहितीच्या माध्यमाने आनंदाची बातमी मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींना आकस्मिक धन लाभ मिळू शकते.  कोणतेही कार्य पूर्ण करण्यापूर्वी यथायोग्य विचार करा. आज व्यापार-व्यवसायात स्थिती मध्यम राहील.
तूळ : विशेष कार्य पूर्ण होतील. मित्रांकडून सहकार्य मिळू शकेल. जबाबदारीचे कार्य मिळतील. राजकीय वातावरण आनंददायक राहील. शत्रू पराभूत होतील. वडिलधार्‍यांचा सहयोग प्राप्त होईल. भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही निर्णय घेऊ नका. आरोग्य नरम-गरम राहील. 
वृश्चिक : एखाद्या कार्यात स्त्री पक्षाकडून सहयोग मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींना अकस्मात लाभ मिळेल. देवाण-घेवाण सावधगिरीने करावे लागतील. अधिकार्‍यांशी संभाषणात सावधगिरी बाळगा. चाकरमान्यांनी सावधगिरीने काम केले पाहिजे. 
धनू : प्रेम व रोमांसमध्ये वेळ खर्च होईल. कला-क्षेत्रात एखादे महत्वपूर्ण यश मिळेल. आर्थिक प्रश्नांचे निराकरण होईल. कोणतेही कार्य घाईगर्दीत करणे टाळा. शेयर व इतर कुठेही गुंतवणूक टाळा. खाणे-पीणे काळजीपूर्वक करा. 
मकर : शिक्षण संबंधी विषयांमध्ये काळ अनुकूल ठरेल. कोणतेही आवेदन देण्यासाठी उत्तम वेळ. मित्रांचा पाठिंबा राहील. मन प्रसन्न राहील. महत्वपूर्ण वार्ता मिळाल्याने मन प्रसन्न राहील. पत्नी व अपत्य यांचाकडून अनुकूल स्थिती मिळेल.
कुंभ : नोकरीपेशा व्यक्तींना पाठबळ मिळेल. आरोग्य उत्तम राहील.  अपत्य आणि इतर विषयांपासून आनंद प्राप्ति होईल. लेखन कार्यास प्रगति होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापारातील प्रतिस्पर्धेत वातावरण अनुकूल राहील.  
मीन : आहारावर विशेष लक्ष द्या. भूमि, वाहनामुळे लाभ होईल. आनंद वाटेल. खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा. घरातील व्यक्तिशी वाद होऊ शकतो.  आनंदाची बातमी कळेल. पुष्कळ दिवसांपासून साचलेली कामे पूर्ण होतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रत्येक परीक्षेत-मुलाखतीत यश मिळवायचे आहे का? जाणून घ्या स्टडी रूमचे महत्त्वाचे वास्तु उपाय