Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राशिभविष्य

कुम्भ
आठवड्याच्या पाहिल्या दिवशी तुम्हाला स्वास्थ्य संबंधी लहान सहानं तक्रारी राहू शकतात. भाऊ बहिणींबरोबर तुमचे संबंध अनुकूल राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात सर्वांची मदत मिळणार आहे. कर्म स्थळावर सूर्य भ्रमण करत असल्यामुळे नोकरी करणार्‍या लोकांचे त्यांच्या बॉसशी संबंध उत्तम राहणार आहे. शासकीय कार्यात यश मिळेल. जमीन,घर व स्थावर मालमत्ता खरेदी करताना जास्त गोंधळून जाऊ नका. या आठवड्यात तुम्हाला परदेश किंवा एखाद्या दूर जागेवर जाण्याचा योग आहे. आई किंवा कुटुंबातील एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी तुमचा मन अशांत करू शकते, म्हणून त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या आठवड्यात तुमचे वैवाहिक जीवन उत्तम असेल. परदेशात राहणार्‍या ओळखीच्या लोकांशी अधिक संवाद होण्याची शक्यता आहे.