Publish Date: Mon, 22 Jan 2024 (13:44 IST)
Updated Date: Mon, 22 Jan 2024 (13:50 IST)
राम ज्यांचे नाव आहे
अयोध्या ज्यांचे गाव आहे..
असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे.
दशरथ नंदन राम,
दया सागर राम,
रघुकुल तिलक राम,
सत्यधर्म पारायण राम,
छंद नाही रामाचा तो देह
काय कामाचा
रघुवंशनाथम, कारुण्यरुपं
करुणाकरं तं शरणं प्रपद्ये,
वाईटाचा त्याग कर,सत्याची कास धर..
अरे मानवा जरा प्रभू रामांच्या
विचाराची कास धर..
रामाप्रती भक्ती तुझी ।
राम राखे अंतरी ।
रामासाठी भक्ती तुझी ।
राम बोले वैखरी ।
प्रभू रामांच्या चरणी लीन
राहाल तर
आयुष्यात कायम सुखी राहाल..
राम अनंत आहे,राम शक्तिमान आहे,
राम सर्वस्व आहे..
राम सुरुवात आहे आणि
राम शेवट आहे.
चरित रघुनाथस्य, शतकोटी प्रविस्तरम,
एकैकं अक्षरं पुसां,
महापातकनाशकम