अयोध्या प्रशासनानं मुस्लीम पक्षकारांना मशिदीसाठी दिल्या जाणाऱ्या 5 जमिनींची पाहणी केली आहे. या पाचही जागा अयोध्या पंचक्रोशी परिक्रमेच्या बाहेर आहेत.
पंचक्रोशी परिक्रमा म्हणजे 15 किलोमीटरचा तो परिसर आहे, ज्याला पवित्र क्षेत्र म्हटलं जातं. सध्या प्रशासनातर्फे पाहणी केल्या गेलेल्या या पाचही जागा पंचक्रोशीबाहेर आहेत.
अयोध्या प्रशासनानं मशिदीसाठी ज्या जागांची पाहणी केली आहे, त्या मलिकपुरा, मिर्झापूर, शमशुद्दीनपूर आणि चांदपूर गावातील जमिनी आहेत. या सर्व जमिनी अयोध्येपासून निघणाऱ्या आणि वेगवेगळ्या शहरांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर आहेत.
सर्वोच्च न्यायालयानं 9 नोव्हेंबरला अयोध्येतील वादग्रस्त जमिनीबाबत निकाल दिला. त्यानुसार वादग्रस्त जमीन रामलल्ला पक्षकारांना देण्यात आली, तर सुन्नी वक्फ बोर्डाला मशीद बांधण्यासाठी अयोध्येतच अन्य ठिकाणी 5 एकर जमीन देण्याचे आदेश दिले.