टाटा कंपनीनं आपल्या तब्बल अडीच लाख कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास सांगितलं आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन संपल्यावरही हे कर्मचारी कायमचं घरातूनच काम करणार आहेत.
टाटा इंडस्ट्रीमधील ‘टाटा कंसल्टेंसी सर्विसेज’ (TCS) या कंपनीनं हा वर्क फ्रॉम होमचा निर्णय घेतला. ट्रॅक डॉट इन या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार या कंपनीत सध्या जवळपास तीन लाख 55 हजार कर्मचारी काम करत आहेत. यांपैकी 75 टक्के कर्मचाऱ्यांना त्यांनी घरातून काम करण्यास सांगितले आहे व 20 टक्के कर्मचारी ऑफिसमध्ये काम करतील.
टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रमण्यम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेला त्यांनी ‘मॉडेल 25’ असं म्हटलं आहे. हा प्रयोग सुरुवातीला ते 2025 पर्यंत करुन पाहणार आहेत. जर हे मॉडेल यशस्वी झाले तर हा प्रकार तसाच सुरु राहील.