Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 12 April 2025
webdunia

लाऊडस्पीकरवर अजान लावल्याने लोकांना त्रास होतो - जावेद अख्तर

People
, सोमवार, 11 मे 2020 (14:54 IST)
मोठ्या आवाजात लाऊड स्पीकरवर अजान लावल्याने अनेकांना त्याचा त्रास होतो असं मत गीतकार जावेद अख्तर यांनी मांडलं आहे. त्यांच्या या ट्वीटवर नेटिझन्सनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

"भारतात 50
वर्षांपर्यंत लाऊड स्पीकरवर अजान लावणं हराम होतं. मात्र कालांतरांनी ते हलाल झालं. इतकंच नाही तर अशाप्रकारे हलाल झालं की त्याची कोणताही सीमा राहिलेली नाही. अजान करणं चांगली गोष्ट आहे. मात्र लाऊड स्पीकरवर अजान लावल्याने इतर नागरिकांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे मला आशा आहे की या परिस्थितीत नक्कीच बदल घडेल," असं ट्वीट त्यांनी केलं होतं.

जर एखाद्या गोष्टीवर बंदी आणायचीच असेल तर लाऊड स्पीकरवर संपूर्णपणे बंदी आणा. मग गणपती असो की अजान असं म्हणत काहींनी अख्तर यांना पाठिंबा दिला आहे तर दुसरीकडे रमझानच्या पवित्र महिन्यात अजानविषयी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पूनम पांडेविरोधात एफआयआर दाखल, प्रियकर सोबत लॉकडाऊनमध्ये फिरणे पडले महागात, कारही जप्त केली