Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Tokyo Olympics : गोल्फर आदिती अशोकमुळे ऑलिम्पिकमध्ये आणखी एका पदकाची आशा

Tokyo Olympics : गोल्फर आदिती अशोकमुळे ऑलिम्पिकमध्ये आणखी एका पदकाची आशा
, शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (10:22 IST)
टोकियो ऑलिम्पिकमध्ये हॉकी, कुस्ती आणि इतर खेळांच्या गर्दीमध्ये कुणाचंही लक्ष नसलेल्या गोल्फमध्ये भारतासाठी आशा पल्लवित झाल्या आहेत.भारताची गोल्फर आदिती अशोक पदकाच्या जवळ पोहोचली आहे.
 
तिसऱ्या राऊंडअखेर आदिती दुसऱ्या स्थानावर होती. शनिवारी सकाळीच चौथ्या राऊंडला सुरुवात झाली. तिनं दुसरं स्थान कायम ठेवलं तर रौप्य पदकाची कमाई ती करू शकते.
 
चौथ्या राऊंडमध्ये नवव्या होलअखेर आदिती अशोक पुन्हा तिसऱ्या स्थानावर घसरली. मात्र अजूनही नऊ होल शिल्लक असल्यानं तिला पुनरागमनाची संधी मिळू शकते.

शनिवारी (7 ऑगस्ट) सकाळी तिनं कामगिरीत आणखी सुधारणा करत अमेरिकेच्या नेली कॉर्डसह पहिलं स्थान पटकावलं.आठव्या होलअखेर तिनं ही कामगिरी केली.शिवाय जर तिनं कामगिरी सुधारली तर आदितीला सुवर्ण पदकाची कमाई करण्याचीदेखील संधी आहे.आदितीनं हे यश मिळवलं तर भारतीय पथकानं आणि अधिकाऱ्यांनी कधी विचारही केला नसेल अशा गोल्फमध्ये भारताला मोठं यश मिळू शकतं.
 
आदितीचं करिअर
आदिती अशोकचा जन्म 29 मार्च 1998 मध्ये बेंगळुरूमध्ये झाला होता. त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून गोल्फ खेळायला सुरुवात केली होती. त्यावेळी बेंगळुरूमध्ये केवळ तीच गोल्फ कोर्स होते.आदितीच्या वडिलांनी तिला गोल्फसाठी पाठिंबा दिला आणि तिला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली.
 
आदिती 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्येही सहभागी झाली होती. त्यावेळी ती केवळ 18 वर्षांची होती. त्यावेळी ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेली ती सर्वात कमी वयाची खेळाडू होती.पण रिओ ऑलिम्पिकमध्ये तिला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती.

त्याशिवाय आदिती ही भारताची पहिली महिला गोल्फर आहे. तिनं एशियन यूथ गेम्स (2013), यूथ ऑलिम्पिक गेम्स (2014), एशियन गेम्स (2014) मध्ये सहभाग घेतला होता.
 
लल्ला आइचा टूर स्कूलला किताब मिळवून देणारी सर्वात कमी वयाची ती भारतीय आहे. या विजयामुळंच तिला 2016 मध्ये लेडिज युरोपियन टूर कार्डसाठी एंट्री मिळाली होती.
 
2017 मध्ये ती पहिली भारतीय महिली प्रोफेशनल गोल्फ असोसिएशन (LPGA) ची खेळाडू बनली.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Rabindranath Tagore Quotes in Marathi रवींद्रनाथ टागोर यांचे सुविचार