Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'भारतातून पाठवलेल्या सिरपमध्ये दोन विषारी घटक', WHO चा इशारा

who
, बुधवार, 26 एप्रिल 2023 (17:19 IST)
who
WHO ने म्हटलंय की, गुइफेनेसिन टीजी सिरपच्या चाचणी नमुन्यांमध्ये 'डायथिलीन ग्लायकॉल' आणि 'एथिलीन ग्लायकॉल' या घटनांची गरजेपेक्षा जास्त मात्र आढळलीय. गुइफेनेसिन टीजी सिरप भारतातील पंजाबस्थित क्यूपी फार्माकेम लिमिटिडेची निर्मिती आहे.
 
या सिरपमध्ये आढळलेले दोन्ही घटक विषारी असतात. या घटकांचं सेवन केल्यास जीवावर बेतू शकतं.
 
WHO ने हे सांगितलं नाहीय की, या सिरपमुळे कुणी आजारी पडला आहे की नाही.
 
क्यूपी फार्माकेमचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर पाठक यांनी बीबीसीला सांगितलं की, "कंपनीने सर्व आवश्यक नियमांचं पालन करून आणि परवानगी घेऊनच कंबोडियाला 18 हजार 346 बॉटल निर्यात केली होती. आम्हाला याची कल्पना नाही की, या सिरप बॉटल मार्शल आयलँड आणि मायक्रोनेशियामध्ये कशा पोहोचल्या?"
 
"आम्ही या बॉटल पॅसिफिक भागात पाठवल्या नव्हत्या. हा सिरप तिथं वापरासाठी प्रमाणित नाहीय. मार्शल आयलँड आणि मायक्रोनेशियामध्ये या बॉटल कुठल्या स्थितीत पोहोचल्या, हे आम्हाला माहित नाहीय."
 
यापूर्वी WHO ने गांबिया आणि उझ्बेकिस्तानमधील लहान मुलांच्या मृत्यूंना भारतात बनलेल्या कफ सिरपला जबाबदार धरलं होतं.
 
खोकल्यावरचं औषध प्यायल्यानंतर 'या' देशात 66 मुलांचा मृत्यू, WHO ने म्हटलं..
जागतिक आरोग्य संघटनेने भारतातल्या औषधोत्पादक कंपनीने तयार केलेल्या कफ सिरप विषयी एक गंभीर इशारा दिला होता.
 
मेडन फार्मास्युटिकल्स या कंपनीने तयार केलेलं कफ सिरप घेतल्यावर गांबियामध्ये 66 बालकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
 
5 ऑक्टोबर 2022 ला झालेल्या पत्रकार परिषदेत WHO ने ही माहिती दिली.
 
"WHO ने आज गांबिया मध्ये सापडलेल्या चार औषधांच्या निर्मिती प्रकियेबाबत एक गंभीर इशारा दिला आहे. हे औषध घेतल्याने अनेक बालकांना किडनीच्या समस्या उद्भवल्या आहेत आणि त्यामुळेच 66 बालकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर हा एक मोठा आघात आहे."
 
"या चार औषधाचं उत्पादन भारतालील मेडन फार्मास्युटिकल्स ही कंपनी करते. WHO आणि भारतात DGCI या प्रकरणाची चौकशी करत आहे. ही औषधं फक्त गांबियामध्ये सापडली आहे. मात्र अन्य देशांतही त्याचं वितरण झालं असेलच. रुग्णांना होणारा हा त्रास टाळण्यासाठी सर्व देशांना या उत्पादनांची नीट चौकशी करण्याचा आणि ती न वापरण्याचा सल्ला WHO देत आहे," असं संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.
 
औषधाची आयात करणारा देश कायम या गुणवत्तेची तपासणी करत असतो. एखादं औषध वापरण्याजोगं आहे याची खात्री पटल्यावरच औषधाचा वापर सुरू होतो.
 
या औषधात डायइथिलीन ग्लायकोल आणि एथिलीन ग्लायकोल असल्याचं WHO ने सांगितल्याचा उल्लेख 'द हिंदू'ने दिलेल्या बातमीत आहे.
 
आरोग्य मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या संपूर्ण घडामोडींना दुजोरा दिला आहे. WHO ने DGCI ला 29 सप्टेंबरलाच सांगितलं होतं की, या औषधाने प्रभावित झालेल्या लोकांना ते मदत करत आहेत.
 
DGCI ने या प्रकरणी राज्य नियामक प्राधिकरणांना यासंदर्भात माहिती दिली आहे. प्राथमिक माहितीनुसार मेडन फार्मास्युटिकल ही कंपनी हरियाणात आहे. त्यांना या औषध निर्मितीचा परवाना आहे. सध्या तरी ही कंपनी फक्त गांबियाला ही औषधं निर्यात करत आहेत.
Published By -Smita Joshi 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

AI टेक्नोलॉजीचा व्हिडीओ व्हायरल