Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुरी : धार्मिक आणि पर्यटन स्थळ

पुरी : धार्मिक आणि पर्यटन स्थळ
WD
भारतातील चार धामांपैकी एक असणा-या पुरी मधील रथयात्रा जगभरात प्रसिध्द आहे. हा सोहळा पहाण्यासाठी या तिर्थक्षेत्रावर देश-विदेशातून भक्तगण लोटतात. यावेळी भगवान जगन्नाथ, त्यांचा भाऊ बलभद्र तसेच बहिण सुभद्रा यांची पूजा-अर्चा केली जाते. या महोत्सव दोन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.

जगन्नाथ मंदीर ते गुंडिचा मंदीर अशी ही रथयात्रा असते. याचठिकाणी जगातील मोठा समुद्रकिनारा आहे. आपण रेल्वे, बस अथवा विमानाने पुरीत येऊ शकतो. अध्यात्माबरोबरच आपणास पर्यटनाची हौस असेल तर समुद्रकिनारा पाहण्यासारखा आहे. उन्हाळी सुट्टीत याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. पूरीदर्शन करण्यासाठी याठिकाणी बस, टॅक्सी तसेच रिक्षांची व्यवस्था आहे.

आनंद बाजारमध्ये सर्वप्रकारचे जेवण मिळते. येथे मोठे मोर्केट आहे. पुरीमध्ये अनेक मंदीरे आहेत. हैं। गुंडिचा मंदीरात जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा देवीच्या मुर्ती प्रस्थापित आहेत.

लोकनाथ मंदी
जगन्नाथ मंदीरापासून केवळ एक किमी. असणारे हे प्रसिद्ध शंकराचे मंदीर आहे. रामाने आपल्या हाताने या शिवलिंगाची स्थापना केल्याच पुराणात उल्लेख आहे. सणांदिवशी या मंदीरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

पुरीतील पुल जगभरात प्रसिद्ध आहेत. येथील छोट्याशा गावात अनेक कलाकार रहातात. त्यांची चित्रे पाहण्याजोगी आहेत. सेनडार्ट ही येथील प्रसिध्द कला आहे. रघुराजपुरची चित्रकलादेखील प्रसिद्ध आहे.

येथील संस्कृती आणि साहित्य परंपरा जाणून घेण्यासाठी पर्यटक विविध संग्रहालयांना भेट देतात. उडीसा स्टेट संग्रहालय, ट्राइबल रिसर्च संग्रहालय तसेच हॅडीक्राफ्ट हाउस अशी संग्रहालये याठिकाणी आहेत. पर्यटकांना रहाण्यासाठी मुबलत रिसोर्ट तसेच हॉटेल्स आहेत. येथे मुक्काम बरून समुद्राचा नजारा पहाण्याची मजा काही औरच आहे.

बालीघाई तसेच सत्याबादी ही प्रसिध्द तीर्थक्षेत्रे याठिकाणी आहेत. याठिकाणी साक्षीगोपाल यांची पूजा केली जाते. 'कोणार्क' हे प्रसिध्द सुर्यमंदीरही याचठिकाणी आहे. शांती मिळवण्यासाठी भक्तगण याठिकाणी येतात. येथे 13व्या शतकातील वास्तु आणि मुर्तीकलेचे नमूने पहावयास मिळतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi