Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

येथे झाला भगवान राम आणि माता सीता यांचा स्वयंवर, नौलखा मंदिर जनकपूर

Janaki Temple jankpur
, बुधवार, 23 ऑक्टोबर 2024 (07:30 IST)
Diwali 2024: जवळच दिवाळी आली आहे सर्वजण साफसाईला लागले आहे. तुम्हाला माहीतच आहे की दिवाळी का साजरी केली जाते कारण दिवाळीलाच प्रभू श्रीराम माता सीताला घेऊन अयोध्या मध्ये आले होते. या दिवशी प्रभू श्रीराम चौदा वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले होते. तसेच तुम्हाला माहित आहे का? प्रभू राम आणि माता सीता यांचे स्वयंवर कुठे झाले ते आज आपण जाणून घेऊ या.  
 
भगवान श्रीराम आणि माता सीता यांचा स्वयंवर नेपाळमधील जनकपूर मध्ये झाला होता. श्रीराम आणि माता  सीता यांचा स्वयंवर नेपाळ नौलखा मंदिरात झाला होता.
 
तसेच भगवान श्रीराम यांचे सासर नेपाळ मधील आहे. नेपाळमधील जनकपुरच्या नौलखा मंदिर हे प्रभू श्रीरामांचे सासर मानले जाते, कारण माता जानकीने आपले विवाह आधीचे जीवन इथेच व्यतीत केले होते. त्यांचा विवाह देखील मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामासोबत इथेच झाला होता. नेपाळमधील जनकपुर मध्ये स्थित या प्राचीन मंदिराची वस्तू पाहून तुम्हाला जाणवेल की, याचा इतिहास श्री राम आणि माता सीता सोबत जोडलेला आहे. 
 
नौलखा मंदिर कोठे आहे?
नौलाखा मंदिर हे नेपाळच्या काठमांडू शहरापासून सुमारे 400 किलोमीटर अंतरावर जनकपूर इथे स्थित आहे. राम आणि सीतेचा विवाह याच मंदिरात झाला होता. हे मंदिर 4860 स्क्वेअर मीटरमध्ये पसरले असून. हे मंदिर बांधण्यासाठी सुमारे 16 वर्षे लागल्याचे सांगितले जाते.
 
नौलखा मंदिर कोणी बांधले?
श्रीराम आणि माता सीता यांनी ज्या मंदिरात विवाहानंतर सप्तपदी घेतले. त्या मंदिराचे नाव नौलखा आहे. जे नेपाळमध्ये वसलेले असून या मंदिराचे बांधकाम 1895 मध्ये सुरू झाले आणि 1911 मध्ये पूर्ण झाले. तसेच नौलखा मंदिर राजपुताना राणी वृषभानु कुमारी यांनी बांधले होते. त्यावेळी हे मंदिर बांधण्यासाठी सुमारे नऊ लाख रुपये खर्च झाल्याचेही सांगितले जाते. त्यामुळेच या मंदिराचे नाव नौलखा ठेवण्यात आले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रिन्स नरुला एका गोंडस मुलीचा बाबा झाला, युविकाने दिला मुलीला जन्म