Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 24 April 2025
webdunia

सिद्धीदात्री देवी मंदिर सागर

Siddhidatri Sagar
, मंगळवार, 1 एप्रिल 2025 (07:30 IST)
देशात शारदीय नवरात्र मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. तसेच नवरात्रीत दुर्गा देवाच्या नऊ रूपांची विशेष पूजा केली जाते. भारतात दुर्गा देवाच्या नऊ रूपांचे मंदिर वेगवगेळ्या ठिकाणी आहे व तिथे मोठ्या उत्साहात पूजा केली जाते. तसेच  दुर्गा मातेचे नववे रूप आहे सिद्धीदात्री, तसेच सिद्धीदात्री देवीचे हे मंदिर मध्यप्रदेशमधील सागर मध्ये स्थित आहे. देवीच्या या मंदिरात मोठ्या संख्येनें भक्त दर्शनासाठी येत असतात. देवी आपल्या समर्पित भक्तांना प्रत्येक प्रकारची सिद्धी देते याकरिता दिवीचे नवने रूप सिद्धीदात्री म्हणून ओळखले जाते. 
 
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीचे दर्शन घेऊन आराधना करण्याचे विशेष महत्व   आहे तसेच कोजागिरी पौर्णिमेपर्यंत मोठ्या संख्यने भक्त सागर मध्ये दाखल होतात. तसेच प्राचीन काळापासून अशी मान्यता आहे की, देवीजवळ मनातील इच्छा व्यक्त केल्यास देवी इच्छा पूर्ण करते म्हणून तीला देवी हरसिद्धि नावाने देखील ओळखले जाते. 
 
सिद्धिदात्री माता दिवसातून तीन रूप धारण करते यामुळे देवी आईचे हे मंदिर देशात प्रसिद्ध आहे. भक्तांच्या मते, सकाळी देवी बालिकेच्या रूपात प्रकट होते. दुपारनंतर आई एका तरुणीचे- नवशक्तीचे रूप धारण करते. मग संध्याकाळनंतर ती भक्तांना एका वृद्ध मातेच्या रूपात आशीर्वाद देते. देवीचे हे मंदिर कधी आणि कसे बांधले गेले याचा पुरावा नाही, परंतु हे मंदिर खूप प्राचीन आणि ऐतिहासिक आहे.
 
तसेच या दिवशी शास्त्रीय विधी आणि पूर्ण भक्तीभावाने साधना करणाऱ्या भक्ताला सर्व सिद्धी प्राप्त होतात. तसेच पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. देवीची पूजा करून भक्तांना कीर्ती, बल, कीर्ती आणि संपत्ती प्राप्त होते. देवी सिद्धिदात्रीचे चार हात आहेत. सिंह त्यांचे वाहन आहे. देवी कमळाच्या फुलावर विराजमान आहे. त्याच्या खालच्या उजव्या हातात कमळाचे फूल आहे. 
 
नवदुर्गांमध्ये माँ सिद्धिदात्री शेवटची आहे. इतर आठ दुर्गांची शास्त्रीय रीतिरिवाजानुसार पूजा करून, दुर्गापूजेच्या नवव्या दिवशी भक्त त्यांच्या पूजेत गुंततात. या सिद्धिदात्री मातेची आराधना केल्यानंतर भक्तांच्या आणि साधकांच्या सर्व प्रकारच्या ऐहिक, दिव्य इच्छा पूर्ण होतात.
 
सिद्धीदात्री देवी मंदिर सागर येथे पोहचण्यासाठी जबलपुर विमानतळ हे 180 किमी अंतरावर आहे. मंदिरापासून काही किमी अंतरावर सागर रेल्वे स्टेशन आहे. मध्य प्रदेशातील सागर हे शहर अनेक महामार्गांना जोडलेले आहे त्यामुळे मंदिरापर्यंत सहज पोहचता येते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने घेतले उज्जैन येथील बाबा महाकालचे दर्शन