Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
गुरुवार, 26 दिसंबर 2024
webdunia

Annabhau Sathe Information in Marathi:लोकशाहीर अण्णाभाऊ साठे माहिती

annabhau sathe
, गुरूवार, 1 ऑगस्ट 2024 (08:35 IST)
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव तुकाराम भाऊराव साठे आहे. हे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. ते मार्क्सवादी-आंबेडकरवादी विचारांचे होते. यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे मांग जातीत झाला त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव आणि आईचे नाव वालबाई होते. जातीय भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. अण्णाभाऊंनी दोन विवाह केले. त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई साठे आणि दुसरी पत्नी जयवंता साठे होत्या. त्यांना तीन अपत्ये होती. 
 
अण्णाभाऊ साठे यांच्यावर कार्ल मार्क्स आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव होता. हे समाजसुधारक आणि साहित्य लेखक देखील होते. त्यांनी अनेक कथा, कादंबरी आणि कवितांचे लिखाण केले. अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. अण्णा भाऊ साठेंच्या साहित्याने अनेकांना प्रेरणा दिली. त्यांचे प्रेरणादायी विचार सुद्धा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. 

त्यांनी पोवाडे, गीत आणि लावण्यांच्या माध्यमातून आपले विचार गरीब जाणते पर्यंत पोहोचवले. त्यांना लोकशाहीर पदवी दिली.  त्यांनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचे निधन 18 जुलै 1969 रोजी झाले. 
 
कथासंग्रह – 
निखारा, नवती, फरारी, पिसाळलेला माणूस, जिवंत काडतूस, आबी, खुळंवाडा, गजाआड, बरबाद्या कंजारी , चिरानगरची भुतं , कृष्णाकाठच्या कथा,
कादंबऱ्या – 
चित्रा , फकिरा , वारणेचा वाघ , चिखलातील कमळ, रानगंगा, माकडीचा माळ, वैजयंता, रत्ना, रूपा, गुलाम, चंदन, मथुरा, आवडी, वैर, पाझर.
लोकनाट्य – 
अकलेची गोष्ट , देशभक्त घोटाळे , शेटजींचे इलेक्शन , बेकायदेशीर , पुढारी मिळाला , लोकमंत्र्यांचा दौरा , माझी मुंबई, कापऱ्या चोर, मूक मिरवणूक.
नाटके
इनामदार, पेंग्याचं लगीन, सुलतान हे त्यांचे साहित्य संग्रह आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Anshuman Gaekwad Passed Away : माजी भारतीय खेळाडू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे कर्करोगाने निधन