Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पप्पा, मम्मीला घेऊन या!

पप्पा, मम्मीला घेऊन या!
, सोमवार, 14 जुलै 2014 (15:03 IST)
हृतिक आणि सुजान यांच्यात वाद निर्माण होऊन दोघेही एकत्र राहत नसले तरी ऋहान आणि ऋदान या मुलांसाठी एकाच छताखाली यावे लागणार असेच लक्षण आहे. नुकतेच हृतिकने आपल्या मुलांसाठी जुहू येथील घरात एक गेम हाऊस तयार केले आहे. त्यामुळे दोघेही आरामात खेळू शकणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हृतिकने आपल्या घराच्या दुसर्‍या मजल्यावर मुलांसाठी प्ले हाऊस बनवले आहे. दोघांनीही हा वीकेण्ड आपल्या वडिलांबरोबर या खेळण्याच्या घरातच काढला. त्यांनाही हे प्ले हाऊस खूपच आवडले.

त्यांनी आपल्या वडिलांना विनंती केली की, या प्ले हाऊसमध्ये आपल्या मम्मीलाही घेऊन या..! त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र खेळू! मात्र या दरम्यान, असे समजते की, हृतिक आणि सुजान यांनी काडीमोडसाठी अर्ज दाखल केला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीच त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कमीत कमी आपल्या मुलांसाठी तरी हे दोघे एकत्र येतील, अशी आशा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi