‘फॅशन’ या सिनेमात दिसलेला मराठमोळा चेहरा मुग्धा गोडसे.. सध्या याच मुग्धानं आपण अभिनेता राहुल देव याच्यासोबत डेट करत असल्याचं कबूल केलंय. बॉलिवूड अभिनेत्री मुग्धा गोडसे हिनं राहुल देव याच्यासोबत संबंधात असल्याच्या बातम्यांना दुजोरा दिलाय. राहुल आणि मुग्धाला अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. ‘आम्ही दोघं एकमेकांसाठी एका मित्राहून जास्त आहोत.. आणि हा आमच्यासाठी एक अद्भुत अनुभव आहे’ अशा शब्दांत मुग्धानं आपलं आणि राहुलचं नातं व्यक्त केलंय. काही दिवसांपूर्वी मुग्धानं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. यामध्ये, ती राहुलसोबत एका बीचवर आराम करताना दिसत होती. राहुलचं यापूर्वी रिनाशी लग्न झालं होतं. परंतु, 2009 मध्ये कॅन्सरनं रिनाचा प्राण घेतला. दोघांच्या लग्नाला 11 वर्ष झाले होते.. आणि या दोघांचा एक मुलगाही आहे. मॉडल असलेल्या मुग्धानं ‘फॅशन’ सिनेमातून अभिनेत्रीच्या रुपात बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. या सिनेमात प्रियांका चोपडा आणि कंगना राणावत यांनी मुख्य भूमिका निभावल्या होत्या.