Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आमिरच्या नवीन सिनेमाची घोषणा

आमिरच्या नवीन सिनेमाची घोषणा
, शनिवार, 23 मार्च 2019 (09:47 IST)
आमिरने आपल्या 54 व्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या नवीन सिनेमाची घोषणा केली आहे. 'लाल सिंह चढ्ढा' असे या सिनेमाचे नाव असणार आहे आणि तो हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध 'फॉरेस्ट गंप'चा हिंदी रिमेक असणार आहे. आमिरच्या 'सिक्रेट सुपरस्टार'चे डायरेक्शन करणार्‍या अद्वैत चंदनवर या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आमिर आपला महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट महाभारतावर काम करत असल्याच्या बातम्या येत होत्या. त्या सिनेमाचे 7 भाग असणार आहेत आणि आमिर स्वतः कृष्णाचा रोल करणार आहे, असे बोलले जात होते. याशिवाय पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल करण्यासाठीही आमिर आतूर आहे, असेही समजले होते. शिवाजी महाराजांच्या वीरकथांचा आमिरवर खूप प्रभाव आहे. शिवाजी महाराज आणि आपल्या दिसण्यात खूप साधर्म्य आहे आणि आपण त्यांच्या रोलला न्याय देऊ शकतो, असे आमिरला वाटते. त्याच्या या तावरून असे वाटते की त्याचा पुढचा सिनेमा शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारलेला असावा. मात्र आमिरने 'लाल सिंह चढ्ढा'ची घोषणा केली. त्याबरोबर 'महाभारत' हा विषयच आता मागे पडल्याचे स्पष्ट झाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कलाकारांचा रंगोत्सव