बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुश्मिता सेन 23 वर्षांनंतर मिस युनिव्हर्स स्पर्धेची जज म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सुश्मिता सेन सध्या या सौंदर्य स्पर्धांच्या निमित्ताने मॅनिला येथे रवाना झाली आहे. या ठिकाणी ती 65 व्या मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेसाठी परीक्षकाची भूमिका पार पाडणार आहे.
परीक्षक होण्याचा हाच आनंद सुश्मिताने तिच्या सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवरून व्यक्त केला आहे. अवघ्या 16 वर्षांच्या वयात सुश्मिताने हा किताब पटकाविला होता.