Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आलिया नंतर कतरीना होणार आई ! बेबी बंप प्लांट करताना फोटो व्हायरल

katrina kaif
, सोमवार, 14 नोव्हेंबर 2022 (22:08 IST)
अलीकडे आलिया -रणबीर आणि बिपाशा -करणं हे आईबाबा झाले आहेत. आता विकी कौशल आणि कतरीना कडे देखील पाळणा हलणार असल्याची बातमी येत आहे. कतरिना प्रेग्नेंट असल्याची चर्चा सध्या होत आहे. कतरिनाचे 'मेरी ख्रिसमस' चित्रपटाच्या   सेट वरून सोशल मीडियावरून काही फोटो समोर आले आहे. कतरीना बेबी बंप प्लांट करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.कतरीना प्रेग्नेंट आहे का असा प्रश्न उद्भवत आहे.  

फोटो बघून नेटकरी कतरीना प्रेग्नेंट असून विकी-कतरिनाला कन्यारत्नं होण्याची इच्छा  करत आहे. 
सध्या कतरीना विजय सेतुपतीच्या मेरी ख्रिसमस या चित्रपटाचं शूटिंग करत आहे. या चित्रपटात ती महत्त्वाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात कतरीना एका प्रेग्नेंट महिलेची भूमिका साकारत आहे. बेबी बंप प्लांट चा फोटो त्या चित्रपटातील भाग असल्याचे सांगत आहे. कतरीना या चित्रपटातून साऊथ चित्रपटाच्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. सध्या हे दोघे आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये विकी आणि कतरीना वैवाहिक बंधनात बांधले गेले होते. हे जोडपे येत्या डिसेंबर मध्ये त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार असून चाहते त्यांच्या कडून आता गुड न्यूज येण्याची आतुरतेने वाट बघत आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बायकोने चांगलीच कान उघडणी केली