मुंबई उच्च न्यायालयाने बॉलीवूड स्टार ममता कुलकर्णीविरुद्धचा 2 हजार कोटी रुपयांचा ड्रग्ज तस्करीचा खटला फेटाळून लावला आहे. या अभिनेत्रीवर तिचा पती विकी गोस्वामीसह ड्रग्स तस्करीचा आरोप होता. कोर्टाने म्हटले की, ममताविरुद्ध पुरेसे पुरावे नाहीत.त्यामुळे केस बंद करण्यात आली आहे.
पतीसोबत केनियामध्ये स्थायिक होण्यापूर्वी अभिनेत्रीने जवळपास 50 हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्रीचा पती विकी गोस्वामी हा एक ड्रग माफिया आहे जो नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, 1985 अंतर्गत नियंत्रित पदार्थ इफेड्रिनच्या निर्मिती आणि खरेदीमागे आहे. त्याला कथित सूत्रधार म्हणून गोवण्यात आले आहे.या प्रकरणी अभिनेत्रीच्या वकिलाने 2018 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
ठाणे पोलिसांनी एप्रिल 2016 मध्ये मुंबई, ठाणे आणि सोलापूर येथून सुमारे 18.5 टन इफेड्रिन आणि 2.5 टन एसिटिक एनहाइड्राइडची मोठी खेप जप्त केली होती, ज्याची किंमत 2,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. अशा प्रकारे अंमली पदार्थांच्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश झाला.