बिहारच्या प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांचे निधन झाले असून दिल्ली मधील एम्समध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार पद्म पुरस्काराने सन्मानित बिहारच्या प्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांचे मंगळवारी रात्री दिल्लीच्या एम्समध्ये निधन झाले आहे. सोमवारी सायंकाळी शारदा सिन्हा यांची प्रकृती अधिकच खालावली आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पण मंगळवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या बातमीने देशभरातील त्यांच्या हितचिंतकांना मोठा धक्का बसला आहे. शारदा सिन्हा यांनी गायलेली छठ गाणी सध्या सर्वत्र वाजवली जात असून आणि या महान उत्सवादरम्यान त्यांच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांना दुःख झाले आहे.
72 वर्षीय शारदा सिन्हा यांची प्रकृती गेल्या महिन्यातच खालावली होती. त्यानंतर त्यांना दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले. तसेच त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.पण सोमवारी संध्याकाळी शारदा सिन्हा यांची प्रकृती अचानक पुन्हा खालावली. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. पण त्यांनी मंगळवारी रात्री अखेरचा श्वास घेतला व त्या अनंतात विलीन झाल्यात.
शारदा सिन्हा या लोकप्रिय गायिका होत्या आणि त्यांनी गायलेल्या छठ गाण्यांसाठी त्या बिहारमध्ये खूप प्रसिद्ध होत्या. संगीतातील अभूतपूर्व योगदानासाठी त्यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कार मिळाले आहे.