Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 14 April 2025
webdunia

दीपिका-रणवीर नंबर वन कपल

dipika ranveer singh
, गुरूवार, 1 नोव्हेंबर 2018 (14:19 IST)
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्राविषयी सोशल मीडिया आणि वृत्तपत्रातून दिसणार्‍या तर्क-वितर्कांच्या बातम्यांना पूर्णविराम लावत दीपिका-रणवीरने आपल्या लग्राची तारीख इन्स्टाग्रावरून जाहीर केली. यामुळे दोघांचीही इन्स्टाग्रावर सध्या सर्वाधिक लोकप्रियता दिसून येते आहे.

अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्‌स इंडियाद्वारे ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे. या आकडेवारीनुसार, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने 100 गुणांसह स्कोर ट्रेंड्‌स इंडियाच्या अग्रणी स्थानी आपली वर्णी लावली आहे. बॉलिवूडमधल्या या बहुचर्चित जोडीच्या लग्राची वाट त्यांचे चाहते पाहत होते. आणि आपल्या चाहत्यांना दीपिका-रणवीरने दिलेल्या सुखद वृत्तानंतर इन्स्टावर दीपिका-रणवीरच्या लोकप्रियतेने उच्चांक गाठला. रणवीरशिवाय अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, शाहरुख खान आणि आमिर खानसुध्दा स्कोर ट्रेंड्‌स इंडियाच्या इन्स्टाग्राम रँकिंगमध्ये लोकप्रिय होते. तसेच, दीपिकाशिवाय प्रियंका चोप्रा, अनुष्का शर्मा, जॅकलिन फर्नांडीज आणि सोनमकपूर स्कोर ट्रेंड्‌स इंडियाच्या इंस्टाग्राम रँकिंगवर पहिल्या पाच लोकप्रिय तारकांमध्ये होत्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जेव्हा ऐश्वर्या राय 75 लाखाची साडी घालून समोर आली होती, तेव्हा अभिषेकची अशी होती प्रतिक्रिया