Dharma Sangrah

प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामी यांची 'क्यूंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत खास एंट्री!

Webdunia
मंगळवार, 9 डिसेंबर 2025 (11:51 IST)
स्टार प्लसवरील आयकॉनिक शो क्यूंकि सास भी कभी बहू थी कायम चर्चेत राहिला आहे. आता या मालिकेत एक रोमांचक वळण येणार असून ते बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांना निर्माण झाली आहे कारण या मालिकेत प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामी यांनी खास एपिसोड्ससाठी एंट्री झाली आहे. गुजराती सिनेमा आणि दूरदर्शनमधील त्यांचा प्रभावी अभिनयासाठी ओळखले जाणारे गोस्वामी यांनी लालो, कृष्ण सदा सहायते या भक्तिमय ब्लॉकबस्टरमध्ये साकारलेल्या कृष्णाच्या भूमिकेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. त्यांच्या या मालिकेतील एंट्री बद्दल प्रेक्षक देखील बोलताना दिसत "क्यूंकि सास भी कभी बहू थी" मालिकेच्या कथानकात नवा ट्विस्ट येणार असल्याचं कळतंय.

दर्जेदार अभिनय शैली आणि उत्तम स्क्रीन प्रेझेन्समुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले श्रुहद गोस्वामी आगामी एपिसोड्समध्ये एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या या मालिकेतील भूमिकेविषयी अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी सूत्रांच्या मते त्यांच्या मालिकेतील विशेष एंट्रीमुळे सध्या सुरू असलेल्या कथानकावर मोठा परिणाम होणार आहे.

क्यूंकि सास भी कभी बहू ही मालिका कायम टेलिव्हीजन विश्वात चर्चेत राहिलेली मालिका असून या मालिकेच्या कथानकात नाट्यमय घडामोडी घडताना बघायला मिळणार आहे. तुलसी मिहिर आणि नोइनाचा एकत्र फोटो पाहिल्यानंतर ती पूर्णपणे अस्थिर झाली असून या अनपेक्षित घटनेमुळे ते खूप भावूक झाल्याचं बघायला मिळतंय. आगामी भागांत मध्ये त्यांचा नात्यात गैरसमज शक्यता निर्माण झाली आहे. त्यांच्या नात्यांची कसोटी लागणार असून येणारे एपिसोड्स प्रेक्षकांसाठी अधिक रोमहर्षक ठरतील यात शंका नाही.
ALSO READ: रणवीर सिंगच्या "धुरंधर" चित्रपटाने नवीन वाद निर्माण केला, बलुचिस्तानने चुकीचे चित्रण केल्याचा आरोप केला
मालिकेतील चढ उतार बघताना या वळणावर श्रुहद गोस्वामींच्या एंट्रीमुळे मालिकेत काय अजून उत्कांवर्धक गोष्ट बघायला मिळणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. त्यांच पात्र विराणी कुटुंबातील सुरू असलेल्या गोंधळाशी कसे जोडले जाणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्यांच्या मालिकेतील विशेष उपस्थितीने कथानकात वेगळा ट्विस्ट निर्माण होणार असून अजून काय ड्रामा अनुभवयाला मिळणार हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.
ALSO READ: Rahat Fateh Ali Khan Birthday राहत फतेह अली खान यांनी त्यांच्या सुरांनी स्वतःचे वेगळे साम्राज्य निर्माण केले
क्यूंकि सास भी कभी बहू थी पाहा १२ डिसेंबर रोजी रात्री १०:३० वाजता फक्त स्टार प्लसवर !<>

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धर्मेंद्र यांच्या मृत्युपत्रातून उघड झाले मोठे रहस्य: मुलांना वडिलोपार्जित संपत्तीचा वारसा मिळाला नाही

माधुरी दीक्षितच्या 'मिसेस देशपांडे' या शोचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सिद्धांत चतुर्वेदी भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्ही. शांतारामची भूमिका साकारणार, पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

बॉर्डर 2' मधील दिलजीत दोसांझचा पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

श्रेयस अय्यर मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात

सर्व पहा

नवीन

Rahat Fateh Ali Khan Birthday राहत फतेह अली खान यांनी त्यांच्या सुरांनी स्वतःचे वेगळे साम्राज्य निर्माण केले

रणवीर सिंगच्या "धुरंधर" चित्रपटाने नवीन वाद निर्माण केला, बलुचिस्तानने चुकीचे चित्रण केल्याचा आरोप केला

India’s Beautiful Wildlife Train भारतातील सर्वात सुंदर वन्यजीव ट्रेन सफारी

विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी यांच्यावर 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप, राजस्थान पोलिसांनी केली अटक

बिग बॉस 19 च्या अंतिम फेरीत सलमान खान भावुक, धर्मेंद्र यांची आठवण येताच अश्रू अनावर

पुढील लेख
Show comments