Evelyn Sharma Baby Boy अभिनेत्री एव्हलिन शर्माने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी शेअर केली आहे. एव्हलिन दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने मुलाला जन्म दिला आहे. एव्हलिन शर्माने 6 जुलै रोजी मुलासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि त्याचे नावही सांगितले.
एव्हलिन शर्माने मुलाच्या नावाचा खुलासा केला
एव्हलिन शर्माने काही वेळापूर्वीच तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या नवजात बाळासोबत दिसत आहे. दुस-यांदा आई झाल्यानंतर अभिनेत्री खूप आनंदी आहे. या फोटोत तिने मुलाचा चेहरा दाखवला नाही पण फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'जन्म दिल्यानंतर इतकं छान वाटेल असं कधीच वाटलं नव्हतं. मी इतकी आनंदी आहे की गच्चीवर उभं राहून गाणं म्हणू शकते. आमच्या बेबी बॉय आर्डेन (Arden Bhindi) ला हॅलो म्हणा.
2021 मध्ये तुषान भिंडीशी लग्न केले
2021 मध्ये एव्हलिन शर्माने 15 मे रोजी तुषान भिंडीसोबत लग्न केले. या लग्नात फक्त जवळचे लोक आणि काही मित्र सामील झाले होते. लग्नानंतर त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये अभिनेत्रीने एका मुलीला जन्म दिला. लग्नानंतर अभिनेत्री तिच्या कुटुंबासह परदेशात राहत आहे.
जानेवारीमध्ये घोषणा केली होती
एव्हलिन शर्माने 17 जानेवारी 2023 रोजी तिची दुसर्या गर्भधारणा केल्याची बातमी जाहीर केली होती. त्यानंतर तिने बेबी बंप फ्लॉंट करतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. एव्हलिन शर्माच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचे झाले तर ती एक जर्मन मॉडेल आहे.
तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. फ्रॉम सिडनी विथ लव्ह या चित्रपटातून तिनने बॉलिवूडमधील करिअरला सुरुवात केली. यानंतर ये जवानी है दिवानी, नौटंकी साला, यारियां, मैं तेरा हीरो, कुछ कुछ लोचा है यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले.