Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आपण कर्शियल चित्रपटांच्या जाळ्यात अडकलोय : जान्हवी

आपण कर्शियल चित्रपटांच्या जाळ्यात अडकलोय : जान्हवी
, शनिवार, 1 डिसेंबर 2018 (13:07 IST)
अभिनेत्री जान्हवी कपूरचे मानणे आहे की, आजचे निर्माते कमर्शियल चित्रपट बनवण्याच्या जाळ्यात कैद होऊन चित्रपटांची निर्मिती करत आहेत. जान्हवीने म्हटले आहे की, जुने चित्रपट पाहून वाटते की, त्या काळी फिल्ममेकर्सजवळ कथा आपल्या पद्धतीने सांगण्याचे स्वातंत्र्य अधिक होते. आज कोणताही चित्रपट ज्यामुळे महिला व्यक्तिरेखा सशक्त होते, त्याला नारीवादाशी जोडले जाते. 
 
गोव्यातील पणजीमध्ये सुरू असलेल्या भारताच्या 49व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2018 मध्ये आपले पिता बोनी कपूर यांच्याबरोबर एका खास चर्चेत भाग घेण्यासाठी पोहोचलेल्या जान्हवी कपूरने म्हटले आहे की, जुन्या काळाबरोबरच्या तुलनेत आजचे फिल्ममेकर्स स्वतंत्रपणे चित्रपट बनवित नाहीत. कदाचित पूर्वी कथामांडण्याचे स्वातंत्र्य अधिक होते. 
 
आज निर्माता कमर्शियल चित्रपटांच्या जाळ्यात अडकले आहेत. आज जर कुणा महिलेच्या सशक्त व्यक्तिरेखेचे चित्रपट येतात, तेव्हा त्याला नारीवादाशी जोडले जाते, खूप हल्लाबोल होतो. त्या काळी अनेक चांगले चित्रपट जसे मदर इंडिया, चालबाज, सुजाता, बंदिनी, सीता और गीतासारखे अन्यही महिला व्यक्तिरेखा लक्षात घेऊन चित्रपट बनवले होते, परंतु तेव्हा फेमिनिझच्या गोष्टी व्हायच्या नाहीत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अवघ्या काही तासांत ‘2.0’ चित्रपट लीक