सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील विघ्नहर्ता गणेश या पौराणिक मालिकेत मीरा बाईची गोष्ट सादर होणार आहे, आणि यात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे, सुप्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री लव्हिना टंडन. या कथेत मीराबाईचे मागील जीवन आणि वर्तमान जीवन या दोन्हीवर फोकस असेल. या दोन्ही जीवनात ती कृष्णाची निःस्सीम भक्त आहे आणि अत्यंत मनोभावे ती त्याची पूजा करते. जेव्हा राणा संगाच्या कुटुंबात तिचे लग्न झाले तेव्हा आपले लग्न आधीच श्रीकृष्णाशी झाले आहे, असे तिने सांगितले, ज्यामुळे त्या परिवारात मोठा असंतोष निर्माण झाला. इतकेच नाही, तर तिने श्रीकृष्णाशिवाय इतर कोणत्याही देवतेची पूजा करण्यास नकार दिला. जन्माष्टमीच्या प्रसंगी श्रीकृष्णाने तिला दर्शन देऊन आशीर्वाद दिला.
आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना लव्हिना टंडन म्हणाली, “मीरा बाई ही श्रीकृष्णाची निःस्सीम भक्त होती आणि तिच्या मनाचा निर्धार कोणीही कधीच डळमळीत करू शकले नाही. ही भूमिका करताना श्रीकृष्ण आणि भक्त मीरा बाई यांच्या कथेविषयी अनेक अज्ञात गोष्टी मला समजल्या. मीरा बाईसारखी अत्यंत सक्षम व्यक्तिरेखा आणि भगवान कृष्णाविषयीची तिची भक्ती साकारण्याचा अनुभव अद्भुत होता. मला आशा आहे की, मला या भागाचे शूटिंग करताना जो आनंद मिळाला तोच आनंद प्रेक्षकांनाही ही मालिका पाहताना मिळेल.”
बघा विघ्नहर्ता गणेश प्रत्येक सोमवार ते शुक्रवार रात्री 8:00 वाजता