Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राजकपूर जीवनगौरव पुरस्कार सायरा बानोला

राजकपूर जीवनगौरव पुरस्कार सायरा बानोला
राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो व राजकपूर विशेष योगदान पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांना तसेच चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि व्ही.शांतारामविशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे यांना आज घोषित करण्यात आला आहे.
 
सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे  यांनी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनायच्या वतीने दरवरर्षी देण्यात येणा-या या पुरस्काराची घोषणा केली. मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतित केले आहे तसेच चित्रपट सृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या गुणांनी त्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा ज्येष्ठ व्यक्तीला चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव व चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार आणि राजकपूर जीवनगौरव व राजकपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. 
 
जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप ५ लाख रुपये व स्मृतिचिन्ह तर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरुप ३ लाख रुपये व स्मृतिचिन्ह इतके आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री श्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवडसमितीने या पुरस्कारार्थींची २०१७ च्यापुरस्कारांसाठी निवड केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बोबडं बोल