हिंदी चित्रपट निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर आणि विद्या बालन यांचे पती यांनी डिस्ने इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हे पदभार सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी डिसेंबरपासून त्याने पदभार सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतातील असलेल्या डिस्नेचे आंतरराष्ट्रीय मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अॅण्डी बर्ड यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांच्या ठिकाणी यापूर्वी २००८ ते २०१२ या कालावधीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळणारे महेश समत हे पुन्हा एकदा या पदावर रुजू होणार आहेत. महेश कामत हे २८ नोव्हेंबरला ते अधिकृतपणे पदभार सांभाळणार आहेत.