Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बॉलीवूडमध्ये एंट्री करून चांगल्या चांगल्यांना मात देऊ शकते सुहाना खान, वाढदिवसानिमित्त जाणून घ्या 5 रोचक गोष्टी

बॉलीवूडमध्ये एंट्री करून चांगल्या चांगल्यांना मात देऊ शकते सुहाना खान, वाढदिवसानिमित्त जाणून घ्या 5 रोचक गोष्टी
, बुधवार, 22 मे 2019 (16:26 IST)
आज सुपरस्टार शाहरुख खान आणि गौरी खानची मुलगी सुहाना तिचा 19वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलीवूडचे स्टार किड्समध्ये आपला स्टारडम बनवणार्‍यांमध्ये शाहरुख खानची मुलगी सुहाना खान फार पुढे आहे. ती नेहमी चर्चेत असते. सुहानाचा ड्रेसिंग सेंस आणि तिचा लुक नेहमी सोशल मीडियेत वायरल होत असतो. आज सुहानाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तिच्याशी निगडित काही अशा गोष्टी सांगत आहो ज्या तुम्ही याआधी कधीही ऐकल्या नसतील.  
webdunia
सुहाना सध्या चित्रपटांपासून फार दूर असली तरी तिच्या ड्रेसिंग सेंसमुळे ती फेमस आहे. जर तुम्ही तिच्या ड्रेसची किंमत जाणून घ्याल तर हैराण होऊन जाल. सुहाना आता 19 वर्षांची झाली आहे पण तिला महाग कपडे घालायचा शौक आहे. मागच्या वर्षी तिचे लाखोंची किंमत असलेल्या टी-शर्ट चे फोटो वायरल झाले होते.  
webdunia
सुहाना खान सध्या लंडनमध्ये शिकत आहे, लंडन जाण्याअगोदर ती मुंबईच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होती. सुहानाला स्पोर्ट्समध्ये फार आवड आहे.  सुहानाने शाळेत फुटबॉलमध्ये बरेच टूर्नामेंट्स जिंकले आहे. फुटबॉलशिवाय सुहानाला नेहमी वडिलांसोबत IPL मध्ये बघितले जाते.  
webdunia
सुहाना खान पॉप सिंगर जेन मलिकची फार मोठी फॅन आहे. फार कमी लोकांना माहीत असेल की सुहाना खान फार चांगली लेखिका देखील आहे. सुहानाला बेस्ट स्टोरीसाठी कथा नॅशनल अवॉर्डाने सन्मानित केले होते.  
webdunia
सुहाना खानने स्वत: देखील बॉलीवूड एक्ट्रेस बनण्याची इच्छा दाखवली होती. मागे दिलेल्या मुलाखतीत सुहानाने म्हटले होते की ‘तिला एक्ट्रेस बनायचे आहे, ज्यासाठी ती या वेळेस तयारी करत आहे.‘ नुकतेच बॉलीवूड हंगामाने आपल्याला एका रिपोर्टमध्ये सांगितले होते की ‘ती लहानपणापासूनच नॅचरल एक्ट्रेस आहे.‘ 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

म्हणून परिणिती करणार ट्रेनमधून प्रवास