Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

’तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत एक नवी एन्ट्री झाली आहे

bittu tarak mehta ka ulta chasma
, गुरूवार, 7 जुलै 2022 (14:43 IST)
मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही प्रेक्षकांची आवडती मालिका. पण सध्या मात्र चर्चा आहे ती या मालिकेतील कलाकारांच्या येण्या आणि जाण्याने होय, मालिकेतून दयाबेन दीर्घकाळापासून गायब आहेच. त्यानंतर गेल्या काही महिन्यांत अनेक कलाकारांनी मालिकेला बाय बाय केला आहे. तारक मेहता ही भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी काही दिवसांपूर्वी हा शो सोडला आहे.
 
आता टप्पूची भूमिका साकारणाऱ्या राज यानेही मालिका सोडल्याची चर्चा रंगली आहे. याबद्दल निर्मात्यांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. पण हो, आता मालिकेत एक नवी एन्ट्री झाली आहे आणि ही एन्ट्री टप्पूची रिप्लेसमेंट असल्याचे मानले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकेतील टप्पू गायब आहे.
 
टप्पू हा मुंबईच्या बाहेर शिक्षण घेण्यासाठी गेला आहे, असं या मालिकेमध्ये दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे टप्पू ही भूमिका साकारणाऱ्या राजने ही मालिका सोडली आहे, असं म्हटले जात आहे. त्याची जागा बिट्टूने घेतल्याची चर्चा आहे. टप्पूची भूमिका साकारणारा राज 2017 पासून मालिकेत काम करतोय. या आधी अभिनेता भव्य गांधी या मालिकेत टप्पू साकारत होता.
 
भव्य गांधी एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेता आणि बालकलाकार आहे. 2008 मध्ये तारक मेहता का उल्टा चष्मा या नाटकातून त्यांनी बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली. ज्यामध्ये त्याने “दीपेंद्र जेठालाल गडा” उर्फ “टप्पू” ची भूमिका साकारली होती. भव्य गांधी यांचा जन्म 20 जून 1997 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे वडील विनोद गांधी हे व्यापारी होते. अलीकडे 2020 मध्ये वडिलांच्या निधन झाले आहे. सध्या तो आई आणि मोठ्या भावासोबत मुंबईत राहतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमेरिकेत निर्मित पहिला मराठी चित्रपट 9 जुलै रोजी कोल्हापूर येथे प्रदर्शित होणार