Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बेपत्ता झाल्यानंतर तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण पहिल्यांदा मुंबईत पोहोचले

actor Gurucharan
, रविवार, 7 जुलै 2024 (12:29 IST)
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत रोशन सोढी ची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग या वर्षाच्या सुरुवातीला अचानक बेपत्ता झाला. मात्र, तब्बल महिनाभरानंतर तो घरी परतला. काल अभिनेता मुंबईत परतला.
 
अभिनेता मुंबई विमानतळावर आपल्या पाळीव प्राण्यासोबत दिसला. अभिनेताने फुलांचा शर्ट आणि काळी पेंट घातली होती. त्याच्या हातात बॅग होती.याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  
 
गुरुचरण या वर्षी 22 एप्रिल रोजी दिल्लीत बेपत्ता झाले होते आणि सुमारे एक महिन्यानंतर त्यांच्या घरी परतले होते. अभिनेत्याला काही वैयक्तिक आणि व्यावसायिक समस्यांचा सामना करावा लागत होता त्यामुळे ते अध्यात्मिक प्रवासाला निघाले.विमानतळावर दिसल्यानन्तर पापराजीने त्यांना विचारले की, तारक मेहता उलटा चष्माच्या  प्रोडक्शन टीमने त्याची थकबाकी भरली आहे का? यावर गुरुचरण म्हणाले, “होय सर, मी हे जवळपास सर्वांसाठी केले आहे.

तुम्ही शो मध्ये परतणार का असे विचारल्यावर ते म्हणाले, देवाला माहित, मला काही माहित नाही. मला कळल्यावर मी तुम्हाला नक्की सांगेन.

Edited by - Priya Dixit
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमिताभ बच्चन यांचा डीपफेक व्हिडिओ बनवणाऱ्या आरोपींलाअटकेतून अंतरिम दिलासा नाही