Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तारक मेहता का उल्टा चष्माच्या निर्मात्यांनी लता मंगेशकर यांच्या या गाण्याबाबत केली मोठी चूक, मागावी लागली माफी

tarak mehta
, शनिवार, 30 एप्रिल 2022 (08:55 IST)
तारक मेहता का उल्टा चष्मा अनेक वर्षांपासून लोकांचे मनोरंजन करत आहे. शोमध्ये साधी सुदी कॉमेडी केली जाते आणि लोक संपूर्ण कुटुंबासह बसून पाहतात. वर्षानुवर्षे हा शो केवळ प्रसिद्धच नाही तर त्यातील प्रत्येक पात्रांनी लोकांच्या मनात जागा मिळवली आहे. शोचे मजेदार दृश्ये असोत किंवा भावूक करणारे क्षण असो . चाहते ते पाहिल्यानंतर ते सोशल मीडियावर शेअर करत राहतात. अशा परिस्थितीत अनेकवेळा 'तारक मेहता का उल्टा चष्मा' सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागतो. पण अलीकडेच टीएमकेओसी चर्चेत आला जेव्हा शोच्या निर्मात्यांनी एक मोठी चूक केली. आणि ही चूक प्रेक्षकांच्या लक्षात आली.
 
सोमवार, रोजी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये संपूर्ण गोकुळधाम सोसायटी क्लब हाऊसमध्ये बसलेली असल्याचे दाखवण्यात आले होते आणि यावेळी जुन्या काळातील गाणी वाजवली जात होती. शेवटी दिवंगत गायिका लता मंगेशकर यांचे 'ए मेरे वतन के लोगो' हे गाणेही वाजविण्यात आले. सगळी गाणी वाजल्यानंतर त्यावर चर्चा झाली. या गाण्याबाबत भिडे मास्तरांनी    सांगितले की, हे गाणे 1965 मध्ये रिलीज झाले होते आणि हे गाणे ऐकून तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याही डोळ्यात पाणी आले होते. खरे तर हे गाणे 26 जानेवारी 1963 रोजी रिलीज झाले होते. एपिसोडमध्ये गाण्याचे वर्ष चुकीचे सांगण्यात आले आहे.

निर्मात्यांची ही चूक प्रेक्षकांनी पटकन पकडली आणि त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली. शोच्या निर्मात्यांना त्यांची चूक लक्षात येताच त्यांनी तत्काळ माफी मागितली. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या निर्मात्यांनी अधिकृत पेजवरून एक निवेदन जारी केले आणि लिहिले- 'आजच्या एपिसोडमध्ये आम्ही 'ए मेरे वतन के लोगो' गाण्याची रिलीज डेट 1965 सांगितली होती. हे गाणे 26 जानेवारी 1963 रोजी रिलीज झाले होते. भविष्यात अशी चूक होणार नाही याची आम्ही विशेष काळजी घेऊ. आम्ही आमच्या सर्व दर्शकांची आणि हितचिंतकांची माफी मागतो. असित मोदी आणि टीम.
 
'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या निर्मात्यांची माफी पाहून सोशल मीडियावर अनेक चाहते त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले. एका यूजरने लिहिले - काही हरकत नाही सर, चुका होतात आम्ही अजूनही तुमच्यावर प्रेम करतो. तर दुसऱ्याने लिहिले - हे खरे प्रेम आहे. निर्मात्यांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यांनी लगेच माफी मागितली. तुमच्या टीमला सलाम. तर तिथे एका चाहत्याने लिहिले - चुका सर्वांकडून होतात, काही हरकत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Dharmavir- प्रसाद ओक यांना आनंद दिघे यांच्या रुपात बघून बहिण अरुणाताई झाल्या भावूक !