Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उर्फी जावेदचे इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड

उर्फी जावेदचे इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड
, मंगळवार, 5 डिसेंबर 2023 (08:12 IST)
मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद चर्चेत नाही असा एकही दिवस जात नाही. अभिनेत्री अनेकदा हटके आणि अतरंगी फॅशन स्टाईलमुळे किंवा बोल्ड वक्तव्यामुळे चर्चेत असते. पण आता ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. उर्फीचे इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड झाले आहे. पोस्ट शेअर करत तिने यासंदर्भात माहिती दिली आहे.
 
अभिनेत्री उर्फी जावेदचे इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड झाले आहे. तिने स्वत: स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. उर्फीचे इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड झाल्याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड झाल्याने उर्फीचे चाहते हैराण झाले आहेत.
 
उर्फीने सोशल मीडियावर इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड झाल्याचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. उर्फीने आता तिचे अकाऊंट रिकव्हर केल्े आहे. तिने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटवर मेटाने दिलेली माहिती दिसत आहे. कम्युनिटी गाईडलाइन्सचे पालन न केल्याने इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड झाल्याचे यात म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Dinesh Phadnis : दिनेश फडणीस यांना हृदयविकाराचा झटका आला नसल्याचे दयानंद शेट्टी यांनी सांगितले