Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शमिता शेट्टीला फेवर केल्यामुळे करण जोहरवर नाराज यूजर्स

शमिता शेट्टीला फेवर केल्यामुळे करण जोहरवर नाराज यूजर्स
, सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (16:10 IST)
बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या रविवारच्या 'संडे का वार' एपिसोडमध्ये दिव्या अग्रवाल करण जोहरच्या निशाण्यावर होती. खरं तर, दिव्या अग्रवाल शोमध्ये बऱ्याच वेळा हे म्हणताना दिसली होती की तिला या शोची गरज नाही. यावर करणने तिला फटकार लावत म्हटलं की जर तिला शो ची गरज नाही तर ती यातून निघू शकते. 
 
संडे का वार यात करण जोहर दिव्या अग्रवालवर राग काढताना दिसले पण त्याने शमिता शेट्टीला खूप पाठिंबा दिला. दिव्यावर राग काढून शमिताला सर्पोट करणे यूझर्सला फारसे पटले नाही. यूजर्सने करण जोहरला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
 
छोट्या पडद्यावर यंदा 'बिग बॉस ओटीटी' या रियालिटी शोची धमाकेदार सुरुवात झाली आहे. 'संडे का वार' या खास एपिसोड अंतर्गत करणने घरातल्या सर्व स्पर्धंकाची चांगलीच हजेरी लावली. याचदरम्यान करणने स्पर्धक शमित शेट्टीचे प्रचंड कौतुक केलं आहे. तसेच शमिताला काही प्रश्न देखील विचारले. शमिता अनेकदा बिग बॉसच्या घरात एकटीच वावरताना दिसते. या संबधीतच करणने तिला विचारले की, तुझ्या मनावर काही ताण आहे का?, तू घरात एकटीच वावरताना दिसतेय. करणचे शब्द ऐकताच शमिताला रडू कोसळले.
 
शमिता म्हणाली की गेल्या 21 वर्षापासून मी सिनेसृष्टीत काम करत असून प्रवास खूपच खडतर ठरला. इतकी वर्ष मी माझ्या बहिणीच्या सावलीत होते. मी स्वत:ला लकी समजते. मला तिच्या सावलीत खूप सुरक्षित वाटतं. मला लोकं अजूनही शिल्पा शेट्टीची बहिण म्हणूनच ओळखतात. त्यांना मी कोण आहे हे ठाऊक नाही. या गोष्टीची खंत देखील वाटते. स्वत:ची ओळख तयार करण्यासाठी मला आजही खूप स्ट्रगल करावं लागत आहे. शमिताची व्यथा ऐकून करण तिचा आत्मविश्वास वाढवला. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर Omkareshwar Jyotirlinga