12 वी फेल चित्रपटाचा अभिनेता विक्रांत मेसीने या चित्रपटातून प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळावं आहे. या चित्रपटामुळे अभिनेत्याला ओळख मिळाली आहे. अलीकडेच विक्रांत एका गोंडस मुलाचा बाबा झाला आहे. आता या अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मध्ये अभिनेता विक्रांत एका कॅब ड्रायव्हरशी सामान्य माणसांप्रमाणे भांडत आहे. या भांडण्याचा व्हिडीओ कॅब ड्रायव्हरने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडीओ मध्ये विक्रांत कॅब मध्ये बसलेला असून ड्राइवर त्याला म्हणत आहे की साहेब तुम्हाला दाखवलेलं भाडं द्यावं लागेल. यावर विक्रांत म्हणतो आपण निघालो त्यावेळी 450 रुपये भाडं ठरलं होतं आता एवढं कस काय वाढलं? या वर कॅब ड्राइव्हर ओरडून म्हणतो म्हणजे तुम्ही भाडे देणार नाही. तेव्हा विक्रांत म्हणतो कशाला देऊ भाऊ आणि ओरडत का आहेस? या वरून दोघांमध्ये चांगलीच वादावादी झांकी आणि विक्रांत ठरवलेल्या भाड्यापेक्षा अधिक भाड्याच्या मागणीवरून चांगलाच चिडला.
नंतर ड्राइव्हरला आपल्या कॅब मध्ये विक्रांत मेसी बसल्याची जाणीव झाल्यावर त्याने वाद मोबाईलमध्ये कैद केला. आणि म्हणाला तुम्ही एवढ्याने पैसे कमावता तुम्हाला पैसे द्यायला काय प्रॉब्लेम आहे. या वरून विक्रांत म्हणाला माझ्या मेहनतीचे पैसे आहे मी जास्तीचे पैसे कशाला देऊ. आणि मग या व्हिडीओ मध्ये ड्राइव्हर वाढलेलं भाडं घेण्यासाठी म्हणत आहे तर विक्रांत जास्त भाडं आकारण्यावरून आपलं म्हणणं मांडत आहे. आणि अॅप ऐनवेळी करत असलेल्या भाडेवाडी बद्दल आक्षेप घेताना दिसत आहे. या व्हिडिओची अद्याप पुष्टी झालेली नाही.
.या व्हिडीओ वर नेटकऱ्यानी प्रतिक्रिया देत विक्रांतला साथ दिली.हा व्हिडीओ अभिनेत्याचा सामाजिक मोहीम साठीचा प्रोमोशनल व्हिडीओ होता.