Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतीय वन सेवा

(Indian forest service)

भारतीय वन सेवा
NDND
केंद्र सरकारच्या अंतर्गत येणार्‍या सेवेसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत परिक्षा घेतली जाते. या परिक्षेसाठी बसणार्‍या सर्वसाधारण विद्यार्थ्यांचे वय 21 ते 30 च्या दरम्यान असावे. मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय जमातीतील विद्यार्थ्यांसाठी पाच वर्ष वयाची अट शिथिल असते.

भारतीय वनसेवेची परिक्षा देण्यासाठी पशुपालन, व्हेटरनरी सायन्स, वनस्पतीशास्त्र (बॉटनी), रसायनशास्त्र (केमेस्ट्री), भूगर्भशास्त्र (जिओलॉजी), गणित, भौतिकशास्त्र (फिजिक्स), प्राणीशास्त्र (झुलॉजी), शेतकी (एग्रीकल्चर), फारेस्ट्रिया इंजिनियरींग इत्यादी विषयांत पदवी असलेले विद्यार्थी या परिक्षेसाठी पात्र असतात.

या परिक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना लालबहादुर शास्त्री अकादमीमध्ये सुरवातीचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर देहरादून येथे असलेल्या इंदिरा गांधी नॅशनल फॉरेस्ट अकादमीत या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जाते. येथील प्रशिक्षणानंतर त्यांची सहायक वनपाल (असिस्टंट कॉन्जरवेटर), रेंजर (डिस्ट्रिक्ट कंजरवेटर), कंजरवेटर, चीफ कंजरवेटर या पदापासून वन महानिरीक्षक (इन्स्पेक्टर जनरल ऑफ फॉरेस्ट) पदापर्यंत पोहचू शकतो. भारतीय वनसेवेत केंद्र सरकारमध्ये पर्यावरण सचिव म्हणून शेवटच्या वरिष्ठ पदावर काम करता येते.

स्वयंसेवक संघटना: वनक्षेत्रात ग्रीन वायर्स, वाइल्ड लाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया, वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड, द एनव्हायरमेंट अवेरनेस सोसायटी, पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स (पेटा), सोसायटी फॉर द प्रिव्हेंन्शन ऑफ क्रुएलिटी टू एनिमल्स (एसएसपीसीए) या क्षेत्रात देखील करिअर करता येऊ शकेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi