Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुमच्या एखाद्या कलेतून देखील अर्थार्जन करणे शक्य, जाणून घ्या कसे...

तुमच्या एखाद्या कलेतून देखील अर्थार्जन करणे शक्य, जाणून घ्या कसे...
, गुरूवार, 10 डिसेंबर 2020 (14:05 IST)
तुमच्या अंगी एखादी कला आहे का? नेल आर्ट, टॅटू काढणं, बागकाम, चित्रकला, योगासनं, कुकिंग यापैकी किंवा  यापेक्षाही वेगळी कला तुमच्या अंगी असेल तर तुम्ही अर्थार्जन करू शकता.
 
नोकर्यावर आलेली गदा, कामगार कपात यामुळे अजिबात निराश होऊ शकता. स्वावलंबी होण्याचे असंख्य पर्याय तुमच्याकडे आहेत. तुम्ही ऑनलाइन क्लासच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न मिळवू शकता.
 
* तुमची चित्रकला चांगली असेल तर ऑनलाइन ड्रॉईंग क्लास सुरू करायला हरकत नाही. त्यातही मधुबनी पेंटिंग, वारली पेंटिंगचं कौशल्य असेल तर लहान मुलांसह प्रौढही ही कला शिकू शकतात. तुम्ही छान कलाकुसर करत असाल तर ग्लास पेंटिंग, ग्रिटिंग कार्ड मेकिंगचे क्लास घेता येतील.
* तुमच्या हाताला चांगली चव असेल तर तुम्ही स्वतःचं यू ट्यूब चॅनेल सुरू करू शकता. या चॅनेलवर रेसिपी अपडेट करत राहा किंवा ऑनलाइन कुकिंग, बेकिंग क्लास सुरू करा. चॉकलेट मेकिंग, बिस्किट मेकिंग, केक मेकिंगचे क्लास सुरू करता येतील.
* तरुणाईला टॅटूचं प्रचंड आकर्षण आहे. तुम्ही टॅटू मेकिंगचे क्लास घेऊ शकता. 
* सध्याच्या काळात ताणतणाव बराच वाढला आहे. हा ताण कमी करण्यासाठी बागकाम हा खूप चांगला पर्याय मानला जातो. त्यातच अनेकांकडे जागाही असते. तुम्ही फुलझाडं, भाज्या, मसाल्याचे पदार्थ यांची लागवड करण्याचे क्लास किंवा कार्यशाळा घेऊ शकता.
* थ्रेड वर्क, टेराकोटा, नारळाची करवंटी, ज्यूट अशा साहित्यापासून तयार केलेले दागिने वापरले जातात. तुम्ही हेदागिने घडवण्याचे क्लास घेऊ शकता.
* बॉलिवूड डान्स, झुंबा डान्स, योगा, एअरोबिक्सही ऑनलाइन शिकवता येईल.
* एखादी परदेशी भाषाही ऑनलाइन शिकवता येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दम्याच्या रूग्णांनी आहारात सामील कराव्या या 5 गोष्टी