Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

येत्या काळातील 5 महत्त्वाच्या नोकऱ्या कोणत्या आणि त्यासाठी कोणती कौशल्यं विकसित करावी लागतील?

jobs
, सोमवार, 26 ऑगस्ट 2024 (13:09 IST)
कामगार क्षेत्रात प्रचंड वेगाने बदल होत आहेत आणि आता उपलब्ध असणाऱ्या अनेक नोकऱ्या पुढे उपलब्ध होणार नाहीत. यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी जबाबदार आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने नुकत्याच केलेल्या एका अभ्यासानुसार नवीन तंत्रज्ञानाचा उदय आणि ऑटोमेशन, तसेच हरित अर्थव्यवस्था आणि शाश्वत विकासाकडे सुरू असलेली वाटचाल या दोन गोष्टी जबाबदार आहेत. बिग डाटा, क्लाऊड कम्प्युटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यामुळे तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. त्यामुळे कामगार क्षेत्रात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
 
यात चांगली बाजू अशी आहे की, नवीन तंत्रज्ञानामुळे अर्थव्यवस्थेला उभारी येणार आहे आणि काही नोकऱ्या गेल्या तरी अनेक नवीन नोकऱ्यांची निर्मितीसुद्धा होणार आहे. कारण कमी संसाधनात एखाद्या उद्योगाची वाढ झाली की, त्याचा स्वाभाविकपणे विस्तार होतो. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधील संशोधकांच्या मते, सध्याच्या व्यवसायांपैकी 25% व्यवसाय पुढच्या पाच वर्षात बदलतील. त्यामुळे वाढत्या स्पर्धात्मक कामगार क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाला नवीन कौशल्य आत्मसात करावी लागतील.
 
1. महत्त्वाची कौशल्ये
नवीन कामगार क्षेत्रात टिकायचे असेल तर तंत्रज्ञानाचं शिक्षण असणं अतिशय आवश्यक आहे.
याचा अर्थ असा नाही, की प्रत्येकाला प्रोग्रामिंग लँग्वेज यायला हवी किंवा प्रत्येकालाच मशीन लर्निंगचे बारकावे कळायला हवेत. पण भविष्यात STEM जॉब्सला भरपूर मागणी असेल. STEM ही संकल्पना सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजीनियरिंग आणि मॅथेमॅटिक्स या क्षेत्रांसाठी एकत्रितपणे वापरली जाते. त्यामुळे जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की लहान मुलांना शाळेत कोणत्या विषयांवर लक्ष केंद्रित करायला सांगायचं तर त्याचं उत्तर गणित, कॉम्प्युटर सायन्स आणि विज्ञान हे आहेत.
 
विश्लेषणाची क्षमता हे आणखी एक कौशल्य भविष्यात महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासाठी आकलनक्षमता विकसित करावी लागेल. म्हणजेच मेंदू, विविध पॅटर्न्सचे निरीक्षण करण्याची क्षमता, सर्व बाबी एकमेकांना एकमेकांशी जुळवणं आणि त्यात कोणतेही भावनिक आणि वैयक्तिक प्राधान्यक्रम नसताना निष्कर्ष काढणं ही कौशल्यं देखील महत्त्वाची ठरणार आहेत. हे करण्यासाठी तुम्हाला एकाग्रता, एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं शिकवावं लागेल. कारण गॅजेट्स, सोशल मीडिया, ऑनलाईन गेम्स आणि जाहिराती या गोष्टीचं उद्दिष्ट सतत आपलं लक्ष वेधून घेणं हेच असतं. त्यामुळे फियर ऑफ मिसिंग आऊटचा (FOMO) धोका संभवतो.
 
विश्लेषणात्मक कौशल्यात आजूबाजूच्या गोष्टींबद्दल उत्सुकता, स्वयंशिक्षण, सातत्याने विकास, शिकण्याची क्षमता, तसंच आपल्या उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करणे यांचाही समावेश होतो.
उच्च दर्जाचं इंग्लिश शिकणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं कौशल्य येत्या काळात आत्मसात करावं लागेल.
 
तसंच, विज्ञान, इंजिनिअरिंग, डिझाईन किंवा कला याबाबतीत सर्जनशीलता विकसित करावी लागेल. तंत्रसाक्षरता आणि सर्जनशीलता या दोन्ही गोष्टी अंगीकारणाऱ्या व्यक्तीला पुढच्या काळात सुवर्णसंधी आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या काळात संवाद क्षमता आणि सह-अनुभूती ही येत्या काळातील अतिशय महत्त्वाची कौशल्ये आहेत.यंत्रे कितीही वेगाने विकसित झाली तरी माणसांना माणसे लागतातच. त्यामुळे जीवित माणसाचं लक्ष, टीम वर्क, ऐकून घेण्याची क्षमता, एखादी गोष्ट सांगण्याची क्षमता, आधार, सहानुभूती या गोष्टींचे महत्त्व अधिकच वाढणार आहे.
 
लिंक्डइनवर 2020 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, सध्याच्या नोकरीच्या बाजारात संवाद क्षमता ही अत्यंत महत्त्वाची आहे.वर्कप्लेस टॅलेंट अँड एंगेजमेंट एक्सपर्ट डॅन निग्रोनी म्हणाले की, "कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्सचा कामाच्या ठिकाणी वापर प्रचंड वाढला आहे. अनेक लोक घरून काम करतात, तंत्रज्ञानामुळे आपण जगभरातील लोकांशी कनेक्ट होऊ शकतो. त्यामुळे आपण प्रत्यक्ष कसे बोलतो, कसे ऐकतो आणि इतर व्यक्तींशी कसं जुळवून घेतो हे अतिशय महत्त्वाचं आहे."
 
2. नवीन तंत्रज्ञान
माहिती तंत्रज्ञान आणि नवीन तंत्रज्ञान येत्या काळातील अतिशय महत्त्वाचे क्षेत्र असतील यात शंका नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग यामुळे अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.
प्रॉम्प्ट इंजिनिअर ही या क्षेत्रातील सर्वांत महत्त्वाची संधी आहे. ही व्यक्ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील संवादात तज्ज्ञ म्हणून ओळखली जाते. ती कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानव यांच्यातला दुवा म्हणून काम करते आणि तसेच आलेल्या विनंत्यांचं योग्य प्रकारे नियमन करते.
 
या क्षेत्रातील अन्य नोकऱ्या म्हणजे एथिसिस्ट ही आहे. ही व्यक्ती एथिक्स (नैतिकता) या विषयात तज्ज्ञ असते. तसेच सिक्युरिटी इंजिनिअर, मशीन आणि माणूस यांच्यातील योग्य संवादासाठी युजर फ्रेंडली इंटरफेसचा डेव्हलपर ही सुद्धा या क्षेत्रातील महत्त्वाची संधी आहे.साधारणपणे कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्राचा विचार करायचा झाल्यास विविध क्षेत्रातील लोकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेला स्पर्धक म्हणून न मानता सहकारी मानायला हवं आणि त्याच्याशी कसं सहकार्य करायचं हेही समजून घ्यायला हवं.
 
मोठ्या माहितीचं म्हणजेच बिग डेटाचं विश्लेषण या क्षेत्रात सुद्धा अनेक संधी आहेत. कंट्रोल सिस्टिम, हार्डॉन कोलायडर किंवा नेटफ्लिक्स सारख्या साईटवरून माहिती गोळा करणं यातही संधी आहे.
सायबर सुरक्षा तंत्रज्ञांसाठी नोकऱ्याची अजिबात कमतरता नसेल कारण सगळीकडे अतिशय संवेदनशील माहितीची देवाणघेवाण येत्या काळात होत राहील.आर्थिक क्षेत्रातील तंत्रज्ञान, बिझनेस ॲनालिस्ट आणि ब्लॉकचेन सिस्टिम डेव्हलपर यांचीसुद्धा येत्या काळात गरज भासणार आहे.
 
3. हरित नोकऱ्या
या नोकऱ्या व्यापार, विज्ञान, राजकारण, किंवा पर्यावरणाशी थेट निगडीत आहेतअपारंपारिक ऊर्जेचा विकास, उर्जेचे नवीन स्रोत, बॅटरी, तसंच लुप्त झालेल्या प्रजातींचं संवर्धन, बिझनेस सल्लागार, किंवा कायदेशीर सल्ला तसेच पर्यावरण संरक्षण कायदे या क्षेत्रात निर्माण होऊ शकतात.याबरोबरच नागरी नियोजनकार, वास्तूरचनकार, डिझाइनर्स, आणि स्मार्ट घरांचे डेव्हलपर यांचीसुद्धा गरज येत्या काळात लागणार आहे.
 
4. आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक
जागतिक पातळीवरील लोकसंख्या आता वृद्धावस्थेत पोहोचली आहे. तसेच आयुमर्यादाही वाढली आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेणं आणि उपचारांची गरज लागणार आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाही पुढच्या काळात अतिशय मागणी असणार आहे. जी आरोग्य सेवक फक्त औषधंच नाही तर नैतिक आधार देतील त्यांचीही मागणी येत्या काळात वाढणार आहे..
डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांना रोगनिदानाच्या आणि उपचाराच्या वेगळ्या पद्धती शोधून काढाव्या लागणार आहेत. त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचाही उपयोग होईल.
फिजिओथेरपिस्ट, व्यक्तिमत्त्व विकास समुपदेशक, तसेच आध्यात्मिक गोष्टींबद्दलच्या प्रशिक्षकांचीही मागणी वाढणार आहे.
 
5. मजुरांनाही मागणी
मेकॅनिक, रिपेअरमन, इलेक्ट्रिशियन, बिल्डर यांचीही गरज येत्या काळात भासणार आहे,
ज्या ठिकाणी छोटे आणि कौशल्यपूर्ण कामं वेगवेगळ्या परिस्थितीत करायचे आहेत तिथे माणसांना पर्याय नाही. मात्र मागणी कायम रहावी यासाठी या लोकांनासुद्धा त्यांचं ज्ञान सतत अपडेट करावं लागेल आणि नवीन गोष्टी शिकाव्या लागतील.
शेतीतील नवीन व्यवसायांसाठी सुद्धा मागणी वाढणार आहे. ग्रहावरची लोकसंख्या वाढत आहे आणि खायला तर प्रत्येकालाच हवं आहे. पण तरीही शेतकऱ्यांपेक्षा कौशल्यपूर्ण इंजिनिअरला जास्त मागणी असेल.
 
या क्षेत्रात नोकऱ्या नसू शकतात, कारण...
काही नोकऱ्या अशा आहेत ज्या आता यापुढे राहण्याची शक्यता कमी आहे. कारण त्यांचं ऑटोमेशन करणं अतिशय सोपं आहे. बाजारातून हद्दपार होणाऱ्या नोकऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे
ग्राहक सेवा (कॅशिअर, विक्रेते, सल्लागार इत्यादी)
कार्यालय व्यवस्थापन (रिमोर्ट वर्किंग वाढल्यामुळे)
डेटा एन्ट्री (अर्थ, आकडेवारी, टायपिस्ट्स, टेक्निकल ट्रान्सलेटर)
अकाऊंटिं
एकच काम वारंवार करणारे फॅक्टरी वर्कर्स
स्टोरीटेलिंग
भविष्यवेत्त्यांनी आणखी एक व्यवसाय सांगितला आहे जो पुढच्या काळात अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजे स्टोरीटेलर्सचा.
एखाद्या व्यक्तीचा अनुभव दुसऱ्या व्यक्तीला सांगणं आणि त्याच्याशी निगडीत काहीतरी सर्जनशील काम हजारो वर्षांपूर्वी अतिशय महत्त्वाचं होतं. आताही ते तितकंच महत्त्वाचं असेल.
कृत्रिम बुद्धिमत्ता आली तरी लेखक, कवी, दिग्दर्शक, अभिनेते, विनोदी कलाकार, कलाकार, संगीतज्ज्ञ यांची गरज मोठ्या प्रमाणात भासणार आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
Published By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पंचतंत्र कहाणी : कबूतर आणि मुंगी